पुण्यात गोळीबार! माजी नगरसेवकाची पिस्तूल लोड केली अन् पुढं घडलं भयंकर

On: September 13, 2024 4:00 PM
Pune Crime
---Advertisement---

Pune Crime l गेल्या कित्येक दिवसांपासून पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरात कधी कोयता हल्ले, तर कधी गोळीबार तर कधी ड्रग्ज प्रकरण घडत आहेत. या सर्व घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यानंतर देखील हे गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश येत नाही. कारण आता पुण्यात गोळीबाराचा वेगळाच प्रकार समोर आला आहे.

नेमकं प्रकरण काय? :

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातील विनोद नढे हे माजी नगरसेवक आहेत. तर माजी नगरसेवक विनोद नढे आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन नढे हे दोघेही राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मद्यपान करत बसले होते. मात्र त्या दरम्यान माजी नगरसेवक विनोद नढे यांना त्यांच्या चुलत्याचा फोन आला. त्यावेळी चुलत्यांनी कशाला फिरतो काळजी घेत जा? असा सल्ला दिला. मात्र त्यावर विनोद नढे म्हणाले की, काळजी करु नको, माझ्याकडे सुरक्षेसाठी पिस्तूल आहे.

त्यानंतर विनोद नढे याचा संवाद ऐकून चुलत भाऊ सचिन नढे गंमतीत म्हणाला की, खरंच तुझ्याकडे पिस्तूल आहे का? मग त्यानंतर विनोद नढेने खिशातील पिस्तूल काढून दाखवली. त्यानंतर सचिन नढेने पिस्तूल लोड करून हॉटेलमध्ये थेट गोळीबार केला आहे.

Pune Crime l पुण्यातील माजी नगरसेवकाला अटक :

मात्र या घटनेत सुदैवाने ती गोळी जेवणाच्या प्लेट ठेवायच्या कपटावर लागली. त्यामुळे सुदैव चांगले होते की, ही गोळी शेजारी बसलेल्या व्यक्तीला लागली नाही. अन्यथा यावेळी मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेनंतर या सर्व प्रकारची चौकशी पोलिसांनी केली, मात्र त्यानंतर पोलिसांना हे कारण समजल्यावर एकप्रकारे धक्काच बसला आहे.

गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी सचिन नढे आणि माजी नगरसेवक विनोद नढे या दोघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

News Title – pune vinod nadhe golibar 

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! अजित पवार गटाचे 20 उमेदवार ठरले, संभाव्य यादी समोर

मराठवाड्यात 25 आमदार पाडणार; ‘या’ नेत्याचा जरांगेंना इशारा

विदर्भात भाजपला मोठं खिंडार, माजी आमदार कॉँग्रेसमध्ये करणार घरवापसी?

दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत, फीचर्स

आनंदवार्ता! दमदार बॅटिंगनंतर सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now