पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी ‘मेगा प्लॅन’ तयार

On: August 21, 2025 10:19 AM
Pune Traffic News
---Advertisement---

Pune Traffic News | पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, विशेषत: जुना पुणे-मुंबई महामार्ग आणि मुंबई-बंगळूरू महामार्गावरील चौकांमध्ये प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र आता पुणेकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देहूरोड सेंट्रल चौक, किवळे मुकाई चौक, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील भूमकर व भुजबळ चौकांवरील कोंडी दूर करण्यासाठी एक मोठा ‘मेगा प्लॅन’ आखण्यात आला आहे. (Pune Traffic News)

एलिव्हेटेड कॉरिडॉरचा आराखडा :

या योजनेनुसार महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांचे प्रत्येकी १२ मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर किवळे ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत तब्बल ८.६ किलोमीटर लांबीचा ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ उभारला जाणार आहे.

या प्रकल्पाचा डीपीआर तयार असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतुकीची परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे. (Pune Traffic News)

Pune Traffic News | भूसंपादन आणि मोबदला प्रक्रिया :

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सादर केलेल्या योजनेसाठी सुमारे ८५ टक्के शेतकऱ्यांनी आपली जमीन प्राधिकरणाला दिली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी सध्या मार्किंगचे काम सुरू असून, उर्वरित शेतकऱ्यांनी मोबदला मिळवण्यासाठी नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही भागांमध्ये मोबदला वितरणासाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

या योजनेत चार लेन्सचा एलिव्हेटेड मार्ग, वाकड भूमकर चौकात दुमजली उड्डाणपूल, तसेच मुळा आणि मुठा नदीवरील पुलांवर प्रत्येकी तीन अतिरिक्त मार्गिका उभारण्यात येणार आहेत. याशिवाय किवळे चौक, समीर लॉन, पुनावळे, ताथवडे आणि भूमकर चौक येथे भुयारी मार्ग बनवले जातील.

दरम्यान, या सगळ्या सुविधांमुळे वाहतूक अधिक सुरळीत होणार असून, दैनंदिन कोंडीपासून पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

News Title: Pune Traffic Mega Plan: Elevated Corridor, Double-Decker Flyover & Underpasses to End Congestion

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now