पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

On: January 15, 2025 11:17 AM
Pune News
---Advertisement---

Pune News l पुणेकरांनो घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण पुणे शहरातील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पुणे शहरातील गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालय या दरम्यान टाटा मेट्रोचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता शहरातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरुपात काही मोठे बदल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

बदल काय असणार? :

बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतूकीमध्ये बदल : बाणेरकडून येणारी वाहतूक औंध रोडवर वळवण्यात आली असून राजभवन समोरील पंक्चरमधून युटर्न घेवून पुन्हा विद्यापीठ मार्गे शिवाजीनगर इच्छितस्थळी जावे.

शिवाजीनगरकडून औंधकडे जाणाऱ्या वाहतूकीमध्ये बदल : शिवाजीनगर परिसरातून औंधकडे जाणारी वाहतूक ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून सरळ औंधरोड मार्गे इच्छितस्थळी जातील.

औंधकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतूकीमध्ये बदल : औंधपरिसरातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. ही वाहतूक मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या गेटमधून पुणे विद्यापीठ परिसर-उजवीकडे वळून-वाय जंक्शन- विदयापीठ मुख्य प्रवेशद्वारातून बाहेरपडून इच्छितस्थळी जाईल.

Pune News l पुण्यातील चार मेट्रो मार्गांना अद्याप मंजुरी नाही :

सध्या पुणे शहरात मेट्रोचे सात मार्ग आहेत. त्यातील चार मार्गांना केंद्र सरकारने अद्याप मंजुरी दिली नाही. यामध्ये वनाज ते चांदणी चौक, खडकवासला-स्वारगेट-खर्डी, रामवाडी ते वाघोली, एसएनडीटी ते माणिकबाग या मार्गांना केंद्र सरकारकडून मंजुरी अद्याप मिळालेली नाही.

मात्र पुणे मेट्रोचा स्वारगेट ते शिवाजीनगर हा मार्ग अवघ्या काही दिवसांपूर्वी सुरु झाला आहे. तसेच हा संपूर्ण भुयारी मार्ग आहे. याशिवाय पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान सर्व स्थानके हे भुयारी करण्यात आहेत. त्यामुळे पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे.

News Title :  Pune traffic diversion 

महत्वाच्या बातम्या-

मकोका लागताच वाल्मिक कराडचा आणखी एक धक्कादायक मॅटर समोर!

अजित दादांचा धनंजय मुंडेंना मोठा धक्का?, बीडमध्ये मोठ्या घडामोडी

वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीत तणावपूर्ण शांतता, आता पुढील कारवाई काय?

पंतप्रधान मोदी आज मुंबईत, ‘असा’ असणार संपूर्ण दौरा!

किंक्रांत! आज ‘या’ राशींनी राहावे सावध, वाचा बुधवारचे राशीभविष्य

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now