Pune to Goa flight | पुणेकरांसाठी पर्यटन प्रवास अधिक सोपा आणि जलद करणारी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. कोकण आणि गोव्याला जाण्यासाठी तासनतास घाटरस्ते, वाहतूक कोंडी आणि दमछाक करणारा प्रवास आता टाळता येणार आहे. कारण ‘फ्लाय ९१’ (Fly91) या विमान कंपनीने पुणे ते सिंधुदुर्ग आणि पुणे ते गोवा अशी थेट प्रादेशिक विमानसेवा सुरू केली आहे.
या नव्या सेवेमुळे पुणेकर अवघ्या ६० मिनिटांत सिंधुदुर्ग किंवा गोव्यात पोहोचू शकणार आहेत. विशेष म्हणजे या हवाई प्रवासाचे एकतर्फी भाडे फक्त २,३०० रुपयांपासून सुरू होत असल्याने हा पर्याय मध्यमवर्गीय प्रवाशांसाठीही परवडणारा ठरणार आहे. त्यामुळे पर्यटनासाठी वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार असल्याचे चित्र आहे. (Pune to Goa flight)
अवघ्या तासाभरात कोकण-गोवा प्रवास : :
सध्या पुणे ते सिंधुदुर्ग (Pune to Sindhudurg flight) रस्ते मार्गे जाण्यासाठी साधारण ८ ते ९ तासांचा वेळ लागतो. विकेंड किंवा सुट्ट्यांच्या काळात वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास आणखी त्रासदायक ठरतो. मात्र आता हवाई सेवेमुळे हा प्रवास केवळ एका तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिक ठिकाणं पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
पुणे-सिंधुदुर्ग मार्गावर पुण्याहून सकाळी ८:०५ वाजता विमान उड्डाण करेल आणि ९:१० वाजता सिंधुदुर्गला पोहोचेल. त्यानंतर सिंधुदुर्गहून पुण्याकडे सकाळी ९:३० वाजता विमान सुटून १०:३५ वाजता पुण्यात दाखल होईल. त्यामुळे एका दिवसातही कोकण दौरा शक्य होणार आहे.
Pune to Goa flight | विकेंड पर्यटनासाठी खास वेळापत्रक :
ही विमानसेवा सध्या आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच शनिवार आणि रविवारी उपलब्ध असणार आहे. विकेंडला पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा विचार करूनच हे वेळापत्रक आखण्यात आले आहे. पुणे–गोवा मार्गावर गोव्यातून पुण्याकडे सकाळी ६:३५ वाजता उड्डाण होऊन ७:४० वाजता आगमन होईल, तर पुण्याहून गोव्यासाठी सकाळी १०:५५ वाजता विमान सुटून १२:१० वाजता गोव्यात पोहोचेल.
या सेवेची माहिती सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर ती वेगाने व्हायरल झाली असून अनेक पुणेकरांनी याचे स्वागत केले आहे. विशेषतः कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी किंवा छोट्या ट्रिपसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. (Pune to Sindhudurg flight)
कोकणातील पर्यटनाला चालना देणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचवणे हा या प्रादेशिक विमानसेवेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ही सेवा केवळ पुणेकरांसाठीच नव्हे तर कोकण आणि गोव्याच्या विकासासाठीही महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या नव्या हवाई सेवेमुळे पुणेकरांसाठी कोकण आणि गोव्याचा प्रवास आता अधिक सोयीस्कर, जलद आणि परवडणारा ठरणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ही सेवा गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






