“माझी बदनामी केली जात आहे, मला आत्महत्या…” ; पीडितेच्या वक्तव्याने खळबळ!

On: March 3, 2025 5:01 PM
swargate rape case
---Advertisement---

Pune Swargate Case | स्वारगेट (Swargate) बलात्कार प्रकरणातील पीडितेची बाजू आता प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. असीम सरोदे (Asim Sarode) न्यायालयात मांडणार आहेत. तसेच, पीडित तरुणीची सुरू असलेली बदनामी थांबवण्यासाठी ते अर्ज दाखल करणार आहेत. सध्या पीडित तरुणी मानसिक तणावाखाली असून तिला आत्महत्येचे विचार येत असल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले.

पीडितेच्या मानसिक स्थितीबाबत चिंता व्यक्त-

या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) च्या वकिलांनी पीडितेने संमतीने शरीरसंबंध ठेवले असल्याचा दावा केल्याने पीडित तरुणीवर मानसिक तणाव वाढला आहे. तिच्या (Pune Swargate Case)  समुपदेशनासाठी दोन समुपदेशकांची मदत घेण्यात येत आहे. बलात्कारानंतर समाज माध्यमांद्वारे पीडितेची बदनामी केली जात असल्याने ती खूप व्यथित झाली आहे, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.

पीडितेच्या संरक्षणासाठी न्यायालयात अर्ज दाखल-

ॲड. असीम सरोदे म्हणाले की, “पीडितेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही कोर्टात वकीलपत्र दाखल केले आहे. तिच्या मानसिक स्थितीचा विचार करून न्यायालयाने तिचे संरक्षण सुनिश्चित करावे.”

तसेच, पीडितेबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये होणाऱ्या असंवेदनशील चर्चेवर नाराजी व्यक्त करत त्यांनी पोलिसांनी अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.

बलात्कारानंतर पीडितेने जीवनदानाची याचना केली होती-

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील (Pune Swargate Case) पीडितेने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात आरोपीने तिचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. जीव वाचवण्यासाठी तिने आरोपीकडे गयावया करत, “दादा, मला जीवे मारू नका” अशी विनंती केली होती. भीतीमुळे तिने विरोध केला नाही किंवा आरडाओरडा केला नाही, असे तपासातून निष्पन्न झाले आहे.

News Title : Pune Swargate Case girl give statement

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now