पुणे हादरलं! स्पाच्या नावाखाली सुरू होता धक्कादायक प्रकार, पुण्यातील मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

On: April 26, 2025 3:34 PM
Epstein Files America
---Advertisement---

Pune News | पुणे शहरातील खराडी (Kharadi) भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खराडी पोलिसांनी (Kharadi Police) केलेल्या या कारवाईत दोन परदेशी महिलांसह सहा तरुणींची सुटका करण्यात आली असून, स्पाच्या व्यवस्थापकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

बनावट ग्राहक पाठवून छापा

खराडी-मुंढवा (Kharadi-Mundhwa) रोडवरील थिटे नगर (Thite Nagar) येथील गोल्ड प्लाझा इमारतीमधील ‘सिल्वर ब्युटी अँड वेलनेस’ (Silver Beauty and Wellness) नावाच्या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या आड वेश्याव्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती खराडी पोलिसांना (Kharadi Police) मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठवला.

बनावट ग्राहकाकडून हिरवा कंदील मिळताच, पोलिसांनी २४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या स्पा सेंटरवर धाड टाकली. या छाप्यात पोलिसांना दोन परदेशी तरुणींसह एकूण सहा महिला आढळून आल्या, ज्यांची तात्काळ सुटका करण्यात आली.

व्यवस्थापक अटकेत, मालकावर गुन्हा

याप्रकरणी पोलीस अंमलदार पूजा डहाळे (Pooja Dahale) यांनी खराडी पोलीस ठाण्यात (Kharadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्पाचा व्यवस्थापक लेनखोकै किपगेन (Lenkhokai Kipgen) (वय ३०, मूळ रा. मणिपूर) (Manipur) याला अटक केली आहे.

स्पाचा मालक विकास किशोर ढाले (Vikas Kishore Dhale) (वय ३०, रा. माहुली जहांगीर, अमरावती) (Mahuli Jahangir, Amravati) याच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण (Sanjay Chavan) करत आहेत.

Title : Pune Spa Raid: 6 Women Rescued, Manager Arrested

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now