धक्कादायक! पुण्यात टेम्पो चालकाने मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीला चिरडलं, जागीच मृत्यू

On: September 9, 2024 11:23 AM
Nashik Accident
---Advertisement---

Accident l पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना वाढत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी पोर्शे कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण पसरले होते. अशातच आता पुन्हा एकदा एक धक्कादायक अपघात झाल्याची घटना घडली आहे. यावेळी दारुच्या नशेत टेम्पो चालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे व पत्नी गीतांजली अमराळे यांना धडक दिल्याची घटना घडली आहे.

पुण्यात घडला धक्कादायक प्रकार :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुण्यातील कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात टेम्पो चालक आशिष पवार हा दारुच्या नशेत गाड्यांना धडक देत जात होता. त्यावेळी टेम्पो करिश्मा चौकातील सिग्नलजवळ आला. तेव्हा त्याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली अमराळे हे रस्त्यावर उभे होते. टेम्पो चालक आशिष पवारने दारुच्या नशेत टेम्पो त्यांच्या अंगावर घातल्याची घटना घडली.

यामध्ये मनसे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या घटनेमध्ये श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. त्यावेळी त्यांनी टेम्पो चालक आशिष पवारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Accident l मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू :

याशिवाय आशिष पवार या टेम्पो चालकाने करिश्मा चौकात अनेकांना उडवल्याची माहिती देखील पोलीस चौकशीत समोर आली आहे. या टेम्पो चालकाने आधी करिश्मा चौकातील सिग्नलला दोन लहान मुलांना उडवले होते. मात्र तो मद्यपी टेम्पो चालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने टेम्पो तसाच पुढे नेला आणि काही गाड्यांच्या अंगावर देखील वाहन नेले.

त्यानंतर टेम्पो चालकाने पौड फाटा येथे सावरकर उड्डाण पुलाजवळील सिग्नल तोडत दोन स्कुटींना धडक दिली. तसेच यानंतर टेम्पो चालकाने एका कारला देखील धडक दिली. या मद्यधुंद टेम्पो चालक आशिष पवारने तब्बल सात ते आठ जणांना धडक दिली आहे. मात्र या घटनेत मनसे पदाधिकारी श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले आहेत तर त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.

News Title – Pune Shrikant Amrale Accident

महत्वाच्या बातम्या- 

“त्यांना लिजेंड आणि मला शिव्या..”; गीतकार गुलजार यांच्याबद्दल हनीसिंहचं वादग्रस्त वक्तव्य

सोनं पुन्हा झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

शरद पवारांचं धक्कातंत्र सुरूच, पुण्यात भाजपच्या बड्या नेत्याकडून ‘तुतारी’चा प्रचार

देशात आढळला पहिला मंकीपॉक्स संशयित रुग्ण?, ‘या’ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींवर बरसणार सुखाच्या सरी, मिळेल शुभवार्ता

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now