पुणे हादरलं! दाखला घेण्यासाठी आलेल्या मुलीसोबत शाळेतील शिपायाचं घाणेरडं कृत्य

On: October 17, 2025 10:52 AM
Crime
---Advertisement---

Pune Crime | पुण्यातील कर्वेनगर परिसरातील शाळेत अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं. कर्वेनगर येथील एका मुलींच्या शाळेत दाखला घ्यायला आलेल्या २१ वर्षीय मुलीशी ओळख वाढवून शिपायाने तिला अश्लील मेसेज पाठवले, या प्रकरणी शिपायावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शिक्षणसंस्थेत खळबळ उडाली असून, पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेविरोधात तीव्र आंदोलन केले आहे.

ओळखीच्या नावाखाली अश्लील कृत्य

ही घटना बुधवारी कर्वेनगर येथील मुलींच्या शाळेत घडली. आरोपी शिपाई अनिल बावधने (वय ४३, रा. कोथरूड) असा असून, संबंधित २१ वर्षीय तरुणी शाळेत तिचा दाखला घेण्यासाठी आली होती. त्यावेळी मुख्याध्यापिका उपलब्ध नसल्याने दाखल्यावर सही राहिली होती. त्यावेळी बावधने याने मुलीचा मोबाईल क्रमांक घेतला आणि दाखला झाल्यावर कळवितो असे सांगितले.

यानंतर बावधने याने त्या मुलीला वारंवार मेसेज करून त्रास दिला. काही मेसेजमध्ये अश्लील मजकूर असल्याचंही समोर आले आहे. यामुळे मुलीने संताप व्यक्त करत संबंधित शिपायाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवर कारवाई करण्यात पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचे समोर आल्यानंतर सामाजिक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील मराठे यांच्या नेतृत्वाखाली कर्वेनगर पोलिस चौकीसमोर व शाळेच्या गेटबाहेर आंदोलन केले. त्यांनी दोषी शिपायावर तात्काळ कारवाईची मागणी केली.

Pune Crime | मुख्याध्यापकांचा नकार

आश्चर्य म्हणजे आंदोलनाच्या वेळी मुख्याध्यापकांनी कार्यकर्त्यांना दाद न देता शाळेचा गेट बंद करून घेतल. सुरक्षारक्षकांकडून कार्यकर्त्यांना अडवण्यात आले आणि शिपायाला शाळेच्या मागच्या गेटमधून बाहेर पाठवून दिले. पोलिस आल्यानंतर शिपाई शाळेत नसल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती पतित पावन संघटनेचे सुनील मराठे यांनी दिली.

या प्रकरणाबाबत मुख्याध्यापिकांना विचारले असता, “घटनेची मला काहीच माहिती नाही. मुलगी का आली आणि शिपायाने काय केले हे मला ठाऊक नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या या उत्तरामुळे संतापाची लाट निर्माण झाली.

दरम्यान, संस्थेच्या सचिवांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “संबंधित शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. संस्थेचे पथक पोलिस ठाण्यात गेले असून, कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच या प्रकरणात मुख्याध्यापिकांवरही चौकशी व कारवाई करण्यात येणार आहे.” या संपूर्ण घटनेमुळे शाळेच्या प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Title- Pune shocked! A girl was molested by a peon at a school in Warje.

Join WhatsApp Group

Join Now