Pune News l पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, लवकरच त्यांना एक नवीन आणि अत्याधुनिक बसस्थानक मिळणार आहे. महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी शिवाजीनगर स्थानकाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला या प्रकल्पाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ तत्त्वावर हा प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
Pune News l नव्या शिवाजीनगर स्थानकाची वैशिष्ट्ये काय असणार? :
१६ मजली इमारत
तळमजल्यावर बसस्थानक
वाहनतळासाठी दोन तळघर
व्यावसायिक संकुल
आधुनिक सुविधा
बसस्थानकाला खर्च किती व कधी पूर्ण होणार :
या बसस्थानकाच्या बांधकामासाठी ६०० कोटी रुपये खर्च येणार आहे. भूमिपूजनानंतर ३ वर्षांत बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
प्रवाशांना दिलासा :
शिवाजीनगर बसस्थानक मागील ५ वर्षांपासून वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता नवीन बसस्थानक लवकरच सुरू होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.






