आयुष कोमकर हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

On: September 9, 2025 3:34 PM
Ayush Komkar Murder Case
---Advertisement---

Ayush Komkar Murder | पुण्यातील (Pune) नाना पेठ (Nana Peth) परिसरात झालेल्या १९ वर्षीय आयुष कोमकर (Ayush Komkar) याच्या हत्येप्रकरणी, त्याची आई कल्याणी कोमकर (Kalyani Komkar) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कुख्यात गुंड बंडूअण्णा आंदेकर (Banduanna Andekar), त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर (Krishna Andekar) आणि इतर कुटुंबीयांवर हत्येचा कट रचल्याचा, तर दोघांवर प्रत्यक्ष गोळीबार केल्याचा आरोप आहे.

वनराज आंदेकरच्या हत्येच्या बदल्यासाठीच ही हत्या :

समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, कल्याणी कोमकर यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी (१ सप्टेंबर २०२४) झालेल्या वनराज आंदेकरच्या (Vanraj Andekar) हत्येच्या बदल्यासाठीच ही हत्या करण्यात आली. वनराजच्या हत्येप्रकरणी कल्याणी यांचे पती गणेश कोमकर आणि इतर कुटुंबीय तुरुंगात आहेत, तेव्हापासून आंदेकर टोळी बदला घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबावर पाळत ठेवून होती.

या हत्येचा प्रत्यक्षदर्शी आयुषचा लहान भाऊ अर्णव (Arnav) आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी तो आणि आयुष ट्युशनवरून घरी परतत होता. सोसायटीच्या पार्किंगमध्ये गाडी लावत असताना, दबा धरून बसलेल्या दोन मुलांनी (अमन पठाण आणि यश पाटील) धावत येऊन आयुषवर समोरून पिस्तुलाने गोळीबार केला. यात आयुष जागीच कोसळला.

जुने टोळीवैर असल्याचीही माहिती :

ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करण्यापूर्वीच आयुषचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, पोलिसांनी दाखवलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून (CCTV Footage) अर्णव आणि त्याच्या चुलत बहिणीने मारेकरी अमन पठाण (Aman Pathan) आणि यश पाटील (Yash Patil) यांना ओळखले. आंदेकर टोळीने कट रचून या दोघांच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणाच्या मुळाशी महापालिकेने केलेली अतिक्रमण कारवाई आणि जुने टोळीवैर असल्याचीही माहिती आहे. वनराज आंदेकरच्या सांगण्यावरून झालेल्या कारवाईचा राग कोमकर गटाला होता, ज्यातून वनराजची हत्या झाली आणि आता त्याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषचा जीव घेतला, ज्यामुळे पुण्यातील टोळीयुद्ध पुन्हा एकदा पेटले आहे.

News title : Pune Revenge Killing: 11 of Andekar Gang Named in FIR

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now