Pune Rape Case | स्वारगेट (Swargate) बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याने अत्याचार करण्यापूर्वी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत “मी तुला ठार मारेन” असे म्हणत जबरदस्ती केली. जीव वाचवण्यासाठी पीडित तरुणीने त्याला गयावया केल्या आणि “दादा, मला मारू नका” अशी विनवणी केली होती. आरोपीने धमकावून तिला शांत राहण्यास भाग पाडले, असा धक्कादायक तपशील तिच्या जबाबात समोर आला आहे.
तपासासाठी तिकीट मोबाईल आणि महत्त्वाचे पुरावे-
तपास अधिक बळकट करण्यासाठी पोलिसांनी पीडितेचे फलटणला (Phaltan) जाण्यासाठी घेतलेले बस तिकीट पुरावा म्हणून जमा केले आहे. आरोपीने तिला दिशाभूल करून बस डेपोतील निर्जनस्थळी नेले आणि तेथील रिकामी ‘शिवशाही’ बस फलटणला जात असल्याचे सांगून तिला आत चढण्यास (pune rape case) भाग पाडले. त्यानंतर बसचे दार बंद करून त्याने अत्याचार केला.
याशिवाय, आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलचा तांत्रिक तपास सुरू आहे. प्राथमिक तपासणीत पीडित आणि आरोपी यांच्यात पूर्वी कोणताही संवाद किंवा ओळख नव्हती, हे समोर आले आहे. पोलिसांनी ज्या बसमध्ये हा प्रकार घडला ती बसही फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली असून, आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
आरोपीला पोलिस कोठडी-
स्वारगेट बस (pune rape case) स्थानकातील बसमध्ये पहाटे साडेपाचच्या (pune rape case) सुमारास आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी या घटनेची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही असतानाही आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि 75 तासांनंतर शिरूर तालुक्यातील गुनाट येथे त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीचा मोबाइल तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, त्याच्या गुन्ह्यांचे अधिक धागेदोरे शोधले जात आहेत.






