पुणेकरांसाठी मोठी बातमी! आता फक्त एकाच कार्डवर मिळणार बस आणि मेट्रोचा प्रवास

On: October 3, 2025 11:30 AM
Pune One Card
---Advertisement---

Pune One Card | पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर आता अधिक सोपा होणार आहे. नागरिकांना बस आणि मेट्रो प्रवासासाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याचा त्रास लवकरच संपणार आहे. ‘वन पुणे कार्ड’ या नव्या उपक्रमामुळे प्रवाशांना एकाच कार्डावरून तिन्ही सेवांचा वापर करता येणार आहे. (Pune One Card News)

आतापर्यंत पीएमपी बससेवा आणि पुणे मेट्रोच्या प्रवासासाठी नागरिकांना वेगवेगळी तिकिटे काढावी लागत होती. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडत होते. मात्र, आता ‘वन पुणे कार्ड’ सुरू झाल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील लाखो प्रवाशांना एकाच कार्डाद्वारे प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे.

पुणेकरांच्या वाहतुकीसाठी नवीन सोय :

या प्रणालीमध्ये पुणे मेट्रो टप्पा-1 (Maha Metro), हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो (Puneri Metro) आणि पीएमपी बससेवा यांचा समावेश होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या नागरिकांना सोयीस्कर प्रवास अनुभवता येईल. सध्या पीएमपी आणि महामेट्रो यांच्या तिकिटांसाठी वेगवेगळ्या बँकांचे पेमेंट गेटवे वापरले जातात. ही अडचण दूर करण्यासाठी आणि एकाच ॲपवरून सर्व सेवा उपलब्ध करण्यासाठी तांत्रिक स्तरावर इंटिग्रेशन सुरू आहे. (Pune One Card)

‘आपली पीएमपीएमएल’ ॲपवरून लवकरच मेट्रोचे तिकीट काढता येईल. यासाठी आवश्यक ‘ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग’चे शेअरिंग पीएमपी आणि महामेट्रोकडून करण्यात येत आहे. या प्रक्रियेनंतर दोन्ही सेवा एकमेकांशी जोडल्या जातील आणि प्रवाशांना एकाच ठिकाणी दोन्ही सुविधांचा लाभ घेता येईल.

Pune One Card | ‘वन पुणे कार्ड’ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट :

महामेट्रो व पुणेरी मेट्रो यांच्यात प्राथमिक चर्चा पूर्ण झाली असून ‘वन पुणे कार्ड’ प्रणाली दोन्हीकडे लागू करण्याची तयारी सुरु आहे. यामुळे नवीन मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतरही प्रवाशांना वेगळे तिकीट काढावे लागणार नाही. महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क) चंद्रशेखर तांबवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या वर्षभरात ही सुविधा उपलब्ध होईल. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा मार्च 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधीच ‘वन पुणे कार्ड’ (Pune One Card) कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

‘वन पुणे कार्ड’ सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचेल, खर्च कमी होईल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर बनेल. हा उपक्रम प्रत्यक्षात आल्यानंतर पुणेकरांना खऱ्या अर्थाने मोठा दिलासा मिळणार आहे.

News title : Pune One Card News

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now