HMPV व्हायरसमुळे पुणे महापालिकेने घेतला मोठा निर्णय!

On: January 7, 2025 4:30 PM
Pune HMPV
---Advertisement---

Pune l सध्या चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. हा विषाणू मोठ्या प्रमाणात फैलावत चालल्याचे समोर आले आहे. मात्र आता भारतातही याचे काही रुग्ण आढळले आहेत. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. मात्र आता महाराष्ट्रातही या विषाणूचा शिरकाव झाला आहे. नागपुरमध्ये एचएमपीव्हीची लागण झालेले दोन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

HMPV व्हायरसमुळे पुणे अलर्ट मोडवर :

HMPV या व्हायरसचे नागपूरमध्ये 2 संशयित रुग्ण आढळले आहेत. यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र अलर्ट मोडवर आला आहे. अशातच आता या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. त्यामुळे या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोना महामारीने होरपळलेलं पुणेही HMPV या व्हायरसमुळे अलर्ट मोडवर आलं आहे. मात्र पुणेकरांनो हा व्हायरस नवीन असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. तसेच यासंदर्भात पुणे महानगरपालिका सक्षम असून सर्व तयारी देखील करण्यात आली आहे.

Pune l नायडू हॉस्पिटलमध्ये 50 स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार :

HMPV या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नायडू हॉस्पिटलमध्ये 50 स्वतंत्र विलगीकरण कक्ष देखील तयार करण्यात आला आहे. तसेच पुणे महापालिकेअंतर्गत असणाऱ्या प्रत्येक क्षत्रिय कार्यालयाला अलर्ट राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच या विषाणूचा पुण्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही.

याशिवाय विमानतळावर प्रवाशांचे तपासणी करण्याचे आदेश देखील अद्यापपर्यंत देण्यात आले नाहीत. मात्र गरज लागल्यास तपासणीचे आदेश देण्यात येणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय राज्याच्या आरोग्य विभागाकडून ज्या सूचना दिल्या आहेत, त्या सर्व सूचनांचं पालन केले जाणार आहे असे पुणे महापालिका आरोग्य विभाग प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितलं आहे.

News Title : Pune on alert mode due to HMPV virus

महत्वाच्या बातम्या –

संतोष देशमुखांच्या भावाने ‘ती’ महत्वाची याचिका घेतली मागे!

‘या’ कारणास्तव आसाराम बापूला जामीन मंजूर!

मुंडे भाऊ-बहिणीविरोधात मराठा समाज आक्रमक, दोघांच्याही राजीनाम्याची केली मागणी

HMPV व्हायरसमुळे मृत्यू ओढावू शकतो का?; मोठी माहिती समोर

वाल्मिक कराडकडे कोट्यवधींची संपत्ती, आकडा पाहून अधिकारीही थक्क

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now