कोथरूड मध्ये पुन्हा दहशत; निलेश घायवळ टोळीवर पुन्हा कारवाई

On: September 26, 2025 4:11 PM
Pune Crime
---Advertisement---

Pune Crime | पुण्यातील कोथरूड परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने पुणे शहर परत एकदा हादरले आहे. निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) आणि त्याच्या साथीदारांनी काही किरकोळ कारणावरून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. १७ सप्टेंबरच्या रात्री मुठेश्वर मित्रमंडळाजवळ प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला, तर पुढे काही अंतरावर सागर साठे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले.

अशा सलग दोन घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “आम्हीच इथले भाई” असं म्हणत आरोपींनी हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली. या प्रकरणानंतर दिसून येते की काही काळ शांत असलेली घायवळ टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.

विमानतळावर लोकआउट नोटीस :

या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी गायवळ टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. आरोपींमध्ये टोळीप्रमुख निलेश गायवळ सोबत मयूर कुंबरे, गणेश राऊत, दिनेश फाटक, मयंक व्यास, आनंद चांदलकर, रोहित आखाडे, अक्षय गोगावले, जयेश वाघ आणि मुसाब शेख यांचा समावेश होता. त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून बाकीचे आरोपी पसार आहेत.

सध्या परदेशात असलेल्या निलेश घायवळच्या (Nilesh Ghaywal News) अटकेसाठी देशातील प्रमुख विमानतळांवर लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. घायवळवर याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी यांसारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद होती. २०१९ मध्ये घायवळ तुरुंगातून बाहेर आला आणि २०२३ मध्ये त्याला बाकीच्या गुन्ह्यांमधून जामीन मिळाला.

Pune Crime | कोण आहे निलेश घायवळ? :

निलेश घायवळ हा एक गुंड असून, तो मूळचा जामखेड तालुक्यातील सोनगावचा आहे. पूर्वी तो गजा मारणे सोबत काम करत होता. तेव्हापासून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची कोथरूडमध्ये असलेल्या सुतारवाडीत दहशत होती. पण काही कारणाने निलेश घायवळ आणि गजा मारणेच बिनसलं, आणि मारण्याच्या गॅंगने घायवळ वर दोन वेळा हल्ले देखील केले.

निलेश घायवळ याने दत्तवाडीतील गुंड सचिन कुडलेची हत्या केली. तो अनेक गुन्ह्यांमध्ये ही सामील होता. त्याच्यावर २३ ते २४ गुन्हे दाखल आहेत.

News title : Pune Nilesh Ghaywal Gang News

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now