Pune News | पुण्यातील (Pune) कोथरूड (Kothrud) परिसरामध्ये हल्ला (Attack) झालेल्या तरुणाचा मृत्यू (Death) झाला आहे. कोथरूडच्या आशिष गार्डनसमोर (Ashish Garden) तीन जणांकडून तरुणावर हल्ला करण्यात आला होता. राहुल जाधव (Rahul Jadhav) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर (Attackers) फरार झाले, त्यानंतर राहुलला पुण्यातील खासगी रुग्णालयात (Private Hospital) नेण्यात आले, पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. (Pune News)
राहुल जाधववर हल्ला करणारे चारही आरोपी अल्पवयीन (Minor) आहेत. या चारही अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे आरोपींपैकी एकाच्या आईसोबत प्रेमसंबंध (Love Affair) होते. या प्रेमसंबंधांवरून सर्व आरोपींनी राहुलला जीवे मारण्याचा निर्णय घेतला.
कोथरूडमध्ये सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडला प्रकार
कोथरूड परिसरामध्ये संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास राहुल सागर कॉलनीमध्ये (Sagar Colony) दुचाकीवरून (Bike) जात होता, तेव्हाच आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने (Koyta) हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की राहुलचा यात मृत्यू झाला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या चारही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी (Inquiry) सुरू आहे. (Pune News)
शाळेच्या पोराने दिली सुपारी (School Boy Gave Contract Killing)
दुसरीकडे पुण्यातच शाळेतल्या मुलाने (School Boy) त्याच शाळेतल्या मुलीला (School Girl) जीवे मारण्यासाठी आणि अत्याचार (Assault) करण्यासाठी 100 रुपयांची सुपारी (Contract Killing of 100 Rupees) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेने प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोठा वाद उद्भवला. दौंडच्या (Daund) सेंट सेबेस्टियन इंग्रजी शाळेमधील हा (St. Sebastian English School) धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शाळेतीलच विद्यार्थिनीला मारून टाकण्याची विद्यार्थ्यांकडून सुपारी देण्यात आली होती. शाळेची बदनामी होऊ नये यासाठी मुख्याध्यापक (Principal) आणि शिक्षकाकडून (Teacher) प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण अल्पवयीन विद्यार्थिनीची बदनामी केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. (Pune News)
एका विद्यार्थ्याने पालकाची खोटी स्वाक्षरी (Fake Signature) केल्याची माहिती विद्यार्थिनीने शिक्षकांना सांगितली होती. खोट्या सहीची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा मनात राग धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार (Rape) करावा नंतर तिचा खून (Murder) करावा यासाठी 100 रुपयांची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली होती.
या दोन्ही घटनांनी पुणे हादरले असून, अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
Title : Pune News Youth Killed In Kothrud Over Love Affair 4 Minors Detained






