जिममध्ये ट्रेनरला वर्कआऊट विचारणं पडलं महागात; पिंपरीमधील धक्कादायक प्रकार समोर

On: January 31, 2025 12:01 PM
Pune News Youth-Beaten-Up-In-Gym-For-Asking-Workout-Routine-Death-Threat-Given
---Advertisement---

Pune News | जिममध्ये (Gym) ट्रेनरला (Trainer) पुढील वर्कआऊटबाबत (Workout) विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण (Beating) केल्याची घटना समोर आली आहे. तसेच, या तरुणाला जीवे मारण्याची धमकीही (Death Threat) देण्यात आली. (Pune News)

ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी पावणेदहाच्या सुमारास सुस रोड (Sus Road) येथील स्टुडिओ व्हेलो सिटी जिममध्ये (Studio Hello City Gym) घडली.

राजन जंग सोनी (वय 33, रा. सुसगाव, मुळशी – Susgav, Mulshi) यांनी या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात (Bavdhan Police Station) फिर्याद (Complaint) दिली आहे. त्यानुसार उमेश सुदाम साळेगावकर (वय 39) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

वर्कआऊटबाबत विचारणा केली म्हणून तरुणाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनी हे जिममध्ये व्यायाम (Exercise) करत असताना पुढील वर्कआऊटबाबत ट्रेनरकडे विचारण्यासाठी गेले. त्यावेळी तिथे असलेल्या उमेश याने सोनी यांना विनाकारण मारहाण केली.

या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांनी आरोपी उमेश साळेगावकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Title : Pune News Youth-Beaten-Up-In-Gym-For-Asking-Workout-Routine-Death-Threat-Given

 

Join WhatsApp Group

Join Now