पुणेकरांनो गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘हे’ 17 रस्ते राहतील बंद, पर्यायी मार्ग कोणते?

On: September 15, 2024 12:02 PM
Pune News Traffic Alert
---Advertisement---

Pune News | गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मुख्य रस्ते संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. वाहतूक शाखेकडून वाहनांच्या पार्किंगसाठी 27 ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे. (Pune News )

‘हे’ मार्ग राहणार बंद

गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. त्यामुळे लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता,  गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे. (Pune News )

विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक, छत्रपती शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रस्त्यावरील दारूवाला पूल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलीस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज् चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील वीर सावरकर पुतळा चौक, लाल बहाद्दुर शास्त्री रोडवरील सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गोखले स्मारक चौकातून वाहतूक वळवण्यात येणार आहे.

याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मध्यरात्रीनंतर शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.

पार्किंगची व्यवस्था कुठे असणार?

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाद (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठे (दुचाकी आणि चारचाकी), एच.व्ही.देसाई महाविद्यालय (दुचाकी व चारचाकी), हमालवाडा, नारायणपेठ (दुचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर (दुचाकी व चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (दुचाकी), हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूर ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवाले प्रशाला, डेक्कन जिमखाना (दुचारी व चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी व चारचाकी), फर्ग्युसून कॉलेज (दुचाकी व चारचाकी), दैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा कॉलेज (दुचाकी), पेशवे पथ (दुचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता (दुचाकी व चारचाकी), नदीपात्र भिडे पूल ते माडगीळ पूल (दुचाकी व चारचाकी) (Pune News )

News Title – Pune News Traffic Alert

महत्त्वाच्या बातम्या-

कीर्तन कार्यक्रमावरून घरी परतत असतानाच काळाचा घाला, धुळ्यात 4 जण जागीच ठार

सोनं पुन्हा रेकॉर्ड मोडणार?, एकाच दिवसात झाली तब्बल ‘इतक्या’ हजारांची दरवाढ

“विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण..”; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

सर्वसामान्यांना झटका! खाद्य तेलाच्या दरात झाली मोठी वाढ

महादेवाच्या कृपेने आज ‘या’ 5 राशींना लाभच लाभ मिळणार!

Join WhatsApp Group

Join Now