पुणेकरांनो गडकिल्ले, टेकड्यांवर 31st साजरा करताय?; मग ही बातमी वाचाच

On: December 31, 2024 10:54 AM
Pune News pune new year celebration restrictions
---Advertisement---

Pune News | नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आली आहे. पुण्यात गडकिल्ले, टेकड्या आणि अभयारण्ये ही सेलिब्रेशनची लोकप्रिय ठिकाणे बनत आहेत. नागरिकांचे शहराबाहेर, निर्मनुष्य ठिकाणी, जंगलाच्या परिसरात जाऊन पार्टी करण्याचे प्रमाण वाढत आहे.  मात्र, या वर्षी वन विभागाने अशा स्थानांवर सेलिब्रेशन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (Pune News )

वन विभागाने स्पष्ट केले आहे की, गडकिल्ले, टेकड्या आणि अभयारण्ये यासारख्या संवेदनशील पर्यावरणीय जागांवर नवीन वर्षाचे  सेलिब्रेशन करणे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या जागांवर सेलिब्रेशन करणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाईल आणि त्यासाठी कडक कारवाई करण्यात येईल.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

वन विभागाने या संबंधित नोटिस जारी करून नागरिकांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. जे नागरिक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या पार्श्वभूमीवरच संरक्षित गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी, राखीव वन क्षेत्रात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (Pune News )

दरम्यान, स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांसह वन विभागाचे कर्मचारी ताम्हिणी, मुळशी, सिंहगड, लोणावळ्यासह पुण्यातील टेकड्यांवर रात्री गस्त घालतील. येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

‘या’ वेळेनंतर पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही

राखीव वनक्षेत्रात सूर्यास्तानंतर फिरण्यास बंदी आहे. नियमांची माहिती नसल्याने अनेकदा लोक मोकळ्या माळरानांवर पार्टी करतात. यामुळे वन्यप्राण्यांच्या वावरावर बंधने येतात आणि निसर्गाचेही नुकसान होते. त्याचमुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील टेकड्या, वन क्षेत्र आणि सिंहगडावर गस्त वाढविण्यात येणार आहे.  (Pune News )

News Title – Pune News pune new year celebration restrictions

महत्त्वाच्या बातम्या-

वर्षअखेरीस गुड न्यूज, सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

वाल्मिक कराड कुठे लपून बसलाय?, सर्वात मोठी अपडेट समोर

मुंबईकरांनो थर्टी फर्स्टला दारू आणि पार्ट्या जरा जपून; अन्यथा…

‘नक्की कोण कुणाचा आका?’; वाल्मिक कराडचा शिंदे-फडणवीस व अजितदादांसोबतचा फोटो व्हायरल

वर्षाच्या शेवटच्या दिवशी देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धनवर्षाव!

Join WhatsApp Group

Join Now