आता पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरही वेश्याव्यवसाय सुरु, आमदाराची तक्रार

On: January 9, 2025 11:36 AM
Pune News Prostitution on the rise in Shivaji Road area
---Advertisement---

Pune News | शहरातील शिवाजी रोड आणि तुळशीबाग परिसरात वेश्याव्यवसाय वाढल्याने नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बुधवार पेठेतील काही महिला या परिसरात उभ्या राहून वेश्याव्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. (Pune News)

विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय

या परिसरात अनेक अभ्यासिका असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी येथे राहतात. विद्यार्थ्यांकडून होणारी हुल्लडबाजी आणि गोंधळामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. (Pune News)

आमदार रासने यांची पोलिसांना भेट

या समस्येबाबत भाजपचे आमदार हेमंत रासने यांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेतली. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्याची आणि त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. (Pune News)

शिवाजी रोड आणि तुळशीबाग परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. यामुळे या परिसरात वेश्याव्यवसाय वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आमदार रासने यांनी केली आहे.

News Title :  Pune News Prostitution on the rise in Shivaji Road area

महत्वाच्या बातम्या –

पुण्यात कुत्र्यांच्या तोंडात मृतदेहाचा तुकडा?; पालिका म्हणते, ‘तो तर पावाचा तुकडा!’

राज्यातील ‘या’ भागाला अवकाळी पावसाचा इशारा!

“धनंजय मुंडे यांच्या नोकराने जमीन हडपली”; महिलेच्या नव्या आरोपांनी खळबळ

चार्जिंगचं टेन्शन विसरा, आता बिनधास्त घ्या ई-कार; सरकारची मोठी घोषणा

बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल

Join WhatsApp Group

Join Now