Pune News : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी 2 वकिलांना अटक, आणखी मोठ्या व्यक्तीचा सहभाग?

On: January 6, 2024 5:07 PM
Pune News: Sharad Mohol
---Advertisement---

Pune News | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol Murder Case) त्याच्या घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सावलीप्रमाणे जवळ वावरणाऱ्या साथीदारांनीच त्याच्यावर गोळ्या चालवल्याने पुण्यात एकच हाहाकार उडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई करत मुख्य आरोपींच्या पुण्याजवळच्या शिरवळ येथे मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या प्रकरणात एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

शरद मोहोळ हत्या प्रकरणी पोलिसांनी (Pune Police) आता दोन वकिलांना अटक केली आहे. दोन्ही वकील पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात (Pune Shivajinagar Court) वकिली करत होते. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी या वकिलांची नावं आहेत. पुणे शाखेच्या गुन्हे पथकांना (Crime Branch Pune Police) मुख्य आरोपींसोबत काल रात्री या दोघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी आणखी मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे का?, याचा तपास केला जात आहे.

वकिलांना का केली अटक?

पुणे पोलिसांनी शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात दोन वकिलांना अटक केल्याने या प्रकाराची सध्या एकच चर्चा सुरु आहे. वकिलांना या प्रकरणात अटक झाल्याने अनेकजण यामागील कारणांचा शोध घेत आहेत. तर या प्रकरणी (Pune News) आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपींना कट रचण्यात तसेच पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप दोन्ही वकिलांवर आहे, त्यामुळे त्यांना अटक केल्याची माहिती आहे.

शरद मोहोळची हत्या केल्यानंतर आरोपींनी सातारच्या (Pune-Satara) दिशेने पळून जाण्याचा प्लॅन केला होता, मात्र पोलिसांना गोष्टीचा सुगावा लागताच त्यांनी आरोपींच्या गाड्यांचे नंबर ट्रेस केले आणि त्यांचा पाठलाग सुरु केला. पुणे पोलिसांनी (Pune News) शिरवळ जवळ ८ जणांना अटक केली, त्यांच्याकडून ३ पिस्तुल सुद्धा जप्त करण्यात आले.

८ जणांमध्ये दोन वकिलांचा सहभाग-

पोलिसांनी अटक केलेल्या ८ जणांमध्ये दोन वकिलांचा देखील सहभाग आहे. याप्रकरणी अधिक तपास केला असता आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचं सिद्ध झालं आहे.

दरम्यान, शरद मोहोळवर शुक्रवारी भर दुपारी गोळ्या झाडण्यात आल्या, पुण्याच्या कोथरुडमधील मध्यवस्तीत भर दुपारी हा प्रकार घडल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलं नसल्याचं चित्र पुण्यात तयार झालं आहे.

News Title: Pune news police arrested two advocates in Sharad Mohol murder case

महत्त्वाच्या बातम्या-

Black Coffee Benefits | डिप्रेशन आणि ताण होईल दूर; ‘ब्लॅक कॉफी’ चे हे फायदे माहितीयेत का?

Aishwarya Rai अभिषेक पेक्षा जास्त कमावते, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘Animal’ फेम Manjot Singh ने वाचवला मुलीचा जीव; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Tecno Pop 8 Launch l अवघ्या 5999 रुपयांत खरेदी करा या कंपनीचा स्मार्टफोन! मिळणार जबरदस्त फीचर्स

Barc TRP Report Week 52 l BARC ने जाहीर केला TRP रिपोर्ट; या 5 सिरीयलने मिळवले अव्वल स्थान

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now