पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द, दिलं हे कारण!

On: September 26, 2024 11:06 AM
Pune News  PM Modi todays visit cancelled
---Advertisement---

Pune News | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 26 सप्टेंबररोज पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र, कालपासून मुंबईसह पुण्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज मुंबई आणि पुण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या सावटामुळे पंतप्रधान मोदींचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. (Pune News)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्वपूर्ण होता. मात्र, पावसामुळे मोदींचा दौरा रद्द झाला आहे. पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडणार होते.

PM मोदींचा आजचा पुणे दौरा रद्द

याचबरोबर पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आज मोदी पुणेकरांना संबोधित करणार होते. मात्र, पावसामुळे ही सभा आता रद्द झाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सूचना केंद्राकडून सोशल मीडियाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी आता निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. दोन्ही आघाडीतील नेत्यांच्या राज्य दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे. निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे महाराष्ट्रात अनेकदा आगमन झाले आहे. (Pune News)

पावसामुळे मोदींचा दौरा रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा जेपी नड्डा यांनी बऱ्याचवेळा महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. लोकसभा निवडणुकावेळी देखील मोदींनी खुपवेळा महाराष्ट्र दौरा केला. नुकतेच अमित शाह हे दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांना निवडणुकीसाठी मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे आवाहन केले. (Pune News)

दोन दिवसांचा दौरा पार पडल्यानंतर बुधवारी मध्यरात्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक देखील घेतली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार होते. मात्र, पावसामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

News Title-  Pune News PM Modi todays visit cancelled

महत्त्वाच्या बातम्या –

अक्षयच्या मृतदेहाचे दहन नव्हे तर दफन होणार, पण अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना

पुण्यात आज PM मोदींचा दौरा, वाहतुकीत झाले मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर?

आज जुळून आला गुरु पुष्य योग; ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळणार!

मुंबई पुन्हा तुंबली! मुसळधार पावसाने लोकल सेवा मंदावली, जनजीवनही विस्कळीत

Join WhatsApp Group

Join Now