…आणि पुणे-नगर रस्त्यावर वाहनं धावू लागली सुसाट!, वाहतूक व्यवस्थेत सर्वात मोठा बदल

On: February 13, 2025 4:46 PM
Dehuroad Red Zone
---Advertisement---

Pune News | पुणे (Pune) शहरातील येरवडा (Yerwada) परिसरातील नगर रस्त्यावर (Nagar Road) असलेला विमाननगर चौक (Vimannagar Chowk) वाहतूक पोलिसांनी सिग्नलमुक्त केला आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी चौकात बॅरिकेड लावून काही वाहनांना वळण दिल्यामुळे, वाहतूक सुरळीत झाली आहे. (Pune News )

वाहतूक पोलिसांचा उपाय

नगर रस्त्यावरील बीआरटी (BRT) मार्गिका आणि विमाननगर फिनिक्स मॉल चौकात सिग्नलमुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी सोडवण्यासाठी माजी आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी पाठपुरावा करून येरवडा पर्णकुटी ते सोमनाथनगर चौकापर्यंतची बीआरटी मार्गिका काढून टाकली. रस्ता रुंद झाला, मात्र विमाननगर चौकात वाहतूक कोंडी सुटत नव्हती.

यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी चौकात बॅरिकेड लावून काही ठिकाणी वाहने वळवण्यास बंदी केली. विमाननगर चौकातून आणि नगर रस्त्याने येणाऱ्या वाहनांना विमाननगरकडे जाण्यासाठी लष्कराच्या अग्निबाण केंद्रासमोरून ‘यू टर्न’ (U-turn) देण्यात आला आहे.

वाहतुकीत सुधारणा

या उपाययोजनेमुळे, विमाननगर चौक वाहतूक कोंडीमुक्त झाला आहे. नगर रस्त्यावरील वाहने वेगाने धावू लागली असून, कोंडीतून नागरिकांची सुटका झाली आहे, असा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. (Pune News )

पुणे शहर वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे (Amol Zende) यांनी सांगितले, “विमाननगर चौकातून वाहने वळवण्यास बंदी केल्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. येत्या काही दिवसांत शास्त्रीनगर चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शास्त्री चौकातून उजवीकडे कल्याणीनगरकडे आणि सह्याद्री हॉस्पिटलकडे वळण्यास बंदी घालण्याचे नियोजन आहे. कल्याणीनगरकडे जाणारी वाहने रामवाडी पोलिस चौकीसमोरून ‘यू टर्न’ घेऊन जातील. सह्याद्री हॉस्पिटलकडे वळणारी वाहने वाडिया बंगल्यासमोरून ‘यू टर्न’ घेतील. त्यामुळे शास्त्रीनगर चौक सिग्नलमुक्त होईल.”

Title : Pune News Nagar Road Speedy Vimannagar Chowk Signal-Free

 

Join WhatsApp Group

Join Now