पुण्यात आमदाराच्या मुलाचं अपहरण, निर्वस्त्र करुन विवस्त्र महिलेसोबत फोटो काढले!

On: November 9, 2024 8:55 PM
Murder
---Advertisement---

Pune News | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना पुण्यातील शिरुरमध्ये आमदार पुत्राचं अपहरण करुन त्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या मुलाचं अपहरण करुन त्याला विवस्त्र करण्यात आलं.

अॅड. असीम सरोदेंनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. सरोदेंनी पत्रकारांशी संवाद साधताना अपहरण झालेल्या ऋषीराज पवारचा व्हिडीओ दाखवला. ऋषीराजनं त्याच्यासोबत घडलेला प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला.

नेमकं काय घडलं?

आमच्यासोबत प्रचारात फिरणाऱ्या भाऊ कोळपे नावाच्या तरुणानं काही जणांनी मीटिंग करायचं असल्याचं सांगितलं. तो दिवसभर आमच्यासोबत प्रचारात होता. हा खेडेगावातील मुलगा असं काही करेल याची शंकाही आली नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही दोघं माझ्या गाडीत बसलो. त्यानंतर माझ्या चालकानं कार मांडवगण वडगाव रोडला नेली, असा घटनाक्रम ऋषीराजनं सांगितला.

इथून पुढे कार जाणार नाही, आपण दुचाकीनं जाऊ, असं कोळपेनं सांगितलं. तिथे आधीपासूनच दोन दुचाकी उभ्या होत्या. त्यानंतर मी त्यांच्या बाईकवर बसलो. त्यांनी मला एका बंगल्यापर्यंत नेलं. मला एका रुममध्ये बोलावलं. तिथे तीन जण रुममध्ये शिरले. त्यांनी रुमचं दार बंद केलं. माझे हातपाय पकडले. एकानं माझ्या शर्टची बटणं उघडली. त्याला मी विरोध केला, अशी आपबिती ऋषीराजनं सांगितली.

Pune News | “माझा गळा दाबला”

त्यांनी माझ्या तोंडावर एक कापड टाकलं. माझा गळा दाबला. मग त्यांनी पिशवीतून एक दोरी काढली आणि आम्हाला तुझा व्हिडीओ पाहिजे असं सांगितलं. या व्हिडीओसाठी आम्हाला 10 कोटी रुपयांची ऑफर असल्याचंही त्यांनी सांगितलं. जिवाची भीती असल्यानं मी घाबरुन ते सांगतील ते करण्यास तयार झालो. त्यांनी माझे कपडे काढले. चौथ्या व्यक्तीनं एका महिलेला खोलीत आणलं. भाऊ कोळपेनं तिघांना रुमच्या बाहेर काढलं. त्यानंतर त्यानं महिलेसोबत माझा बनावट व्हिडीओ काढला, असं ऋषीराजनं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

निलंग्यात रामदास आठवलेंच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा!

‘चंद्रकांत पाटलांसारख्या सुसंस्कृत व्यक्तीला निवडून द्या’; माजी मंत्री सुरेश प्रभूंचं कोथरूडकरांना आवाहन

‘या’ सुप्रसिद्ध सिंगरचा बाथरूममधला व्हिडीओ तूफान व्हायरल!

राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का; अजितदादांच टेन्शन वाढलं

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना ‘इतके’ पैसे मिळणार!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now