अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या डोक्याला ताप, महायुतीच्या 2 आजी-माजी आमदारांमध्ये कलह

On: August 26, 2024 8:47 AM
Pune News Jagdish Mulik criticism on MLA Sunil Tingre
---Advertisement---

Pune News | आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभेत महाविकास आघाडीने महायुतीला चांगलाच धक्का दिला. त्यामुळे विधानसभेतही मविआ महायुतीला मोठी टक्कर देईल, यात शंका नाही. सध्या दोन्ही आघाडीकडून विविध मुद्यांवरून प्रचार देखील केला जातोय. अशात महायुतीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. (Pune News)

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात (Vadgaon Sheri Assembly Constituency) महायुतीत नाराजीचा सूर उमटत असल्याचं दिसून येतंय. वडगाव शेरी विधानसभेचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी ट्वीट केलं आहे. याच ट्वीटवरुन महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याचं बोललं जातंय.

वडगाव शेरीत महायुतीत नाराजीचा सूर?

माजी आमदार जगदीश मुळीक यांनी ट्वीट करून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचं म्हटलंय. तीनशे कोटींच्या विकास कामांच भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत असतानाच त्याच्या आदल्या दिवशी जगदीश मुळीक यांनी ट्वीट करत नाराजी जाहीर केली आहे(Pune News)

वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींची विकासकामे फक्त टिंगरे यांच्या प्रयत्नातून झाली नसून महायुतीतील इतर घटक पक्षांचा देखील त्यात हातभार असल्याचा उल्लेख जगदीश मुळीक यांनी ट्वीटमध्ये केला आहे. त्यांनी हे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केलं आहे.

जगदीश मुळीक यांचं ट्वीट काय?

वडगाव शेरी विधानसभेत महायुतीचा धर्म काय भाजप आणि शिवसेनेनीच पाळायचा का?महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे. वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पण या विकासकामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे, हे आमदार जाणीपूर्वक विसरत आहेत.(Pune News)

तीनशे कोटींच्या विकासकामांचा निधी मिळतो, तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचंही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार महोदय श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाही. असं ट्वीट माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केलं आहे.

दरम्यान, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीकडेच जाणार, अशी जोरदार चर्चा आहे. नुकतीच वडगावशेरीमध्ये अजित पवारांची जनसन्मान यात्रा झाली. यात त्यांनी सुनील टिंगरेच येथे उमेदवार असतील, असे संकेत दिले. त्यामुळे आता महायुतीमध्ये ही जागा नेमकी कुणाला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे.

News Title – Pune News Jagdish Mulik criticism on MLA Sunil Tingre

 

महत्त्वाच्या बातम्या-

युवकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सिनेमातून भाष्य, श्रीयुत नॅान महाराष्ट्रीयन प्रेक्षकांच्या भेटीला

आज गोकुळाष्टमी! कृष्णाच्या कृपेने ‘या’ 5 राशीचं नशीब उजळणार

मलायका अरोराच्या लेकाचा सावत्र आईसोबतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पुण्याच्या राजकारणातील मोठी बातमी; ‘या’ आमदाराने वाढवलं अजित पवारांचं टेंशन

गोरंपान दिसणं झालं सोपं, ‘हे’ 5 नैसर्गिक उपाय आत्ताच ट्राय करा!

Join WhatsApp Group

Join Now