Pune News | भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील चौथा T20 सामना (4th T20 Match) शुक्रवारी 31 जानेवारी रोजी पुण्याच्या (Pune) गहुंजे स्टेडियमवर (Gahunje Stadium) होणार आहे. सध्या मालिकेत टीम इंडिया (Team India) 2-1 ने आघाडीवर आहे. या क्रिकेट सामन्यासाठी गहुंजे परिसरातील वाहतुकीत (Traffic) काही बदल करण्यात आले आहेत. ज्या वाहनधारकांकडे (व्ही. व्ही.आय.पी/व्ही.आय.पी/इतर अत्यावश्यक सेवा) वाहनाचा पास (Pass) असेल अशा वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती महामार्गाच्या (Expressway) उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा (Service Road) पर्याय देण्यात येणार आहे. (Pune News )
मुंबईकडून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग
द्रुतगती मार्गाचे देहूरोड एक्झिट (Dehuroad Exit) मधून डावीकडे वळावे, त्यानंतर तात्काळ परत डावीकडे वळून एक्सप्रेस हायवे लगतच्या मामुर्डी गावाच्या (Mamurdi Village) बाजूने असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे (Parking) जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
द्रुतगती मार्गावरून येणारी वाहने किवळे ब्रिजवरून (Kiwale Bridge) मुकाई चौक (Mukai Chowk) येथून यु टर्न (U-Turn) घेऊन कृष्णा चौक (Krishna Chowk) मार्गे एक्सप्रेस लगतच्या सिम्बॉयसेस कॉलेजच्या (Symbiosis College) बाजूकडील असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
शितलादेवी मंदिर (Shitaladevi Temple) येथून डाव्या बाजूने वळवून लेखा फार्म (Lekha Farm) मार्गे असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
सेंट्रल चौक (Central Chowk) मार्गे मुकाई चौकात येणारी वाहने किवळे ब्रिज खालून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडर-पासचे डाव्या बाजूने अथवा एमएच 04 बोगद्यातून डावीकडे वळून कुणाल आयकॉन चौकाकडून (Kunal Icon Chowk) पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील. (Pune News )
जुन्या मुंबई-पुणे हायवेने (Old Mumbai-Pune Highway) येणारी वाहने सेंट्रल चौक येथून यु टर्न घेऊन साई नगर फाटा (Sai Nagar Phata) मार्गे पार्किंग ठिकाणी जातील.
मनाई – जुना मुंबई पुणे हायवेने येणारी वाहने सोमाटणे फाटा (Somatane Phata), सेंट्रल चौक मार्गे बेंगलोर हायवेवरील (Bangalore Highway) मामुर्डी जकातनाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणारे प्रेक्षकांच्या वाहनांना शितलादेवी मंदिर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे.
पुणे बाजूकडून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग
पुणे बंगलोर महामार्गावरून पवना नदी ब्रिज (Pavana River Bridge), हॉटेल सॅन्टोंसा (Hotel Santosa) पास करून किवळे ब्रिजवरून वाहने डाव्या बाजूकडे वळवावी व 200 मीटर वरून द्रुतगती मार्गाचे डाव्या बाजूने असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करतील.
निगडी (Nigdi), हँगिंग ब्रिजकडून (Hanging Bridge) येणारी प्रेक्षकांची वाहने रावेत चौक (Ravet Chowk), भोंडवे चौक (Bhondve Chowk), मुकाई चौक मार्गे कृष्णा चौक येथून उजव्या बाजूने वळून परत एक्सप्रेस हायवे पासून डाव्या बाजूने वळून असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करतील. (Pune News )
गहुंजे पूल ते वाय जंक्शन मार्गे स्टेडियमकडे फक्त कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात येईल.
मामुर्डी गावातील रुहिदा बिर्याणी ते मासुळकर फार्म बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने मामुर्डी जकातनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
मरीमाता चौक किवळे नाला येथून मासुळकर फार्म बाजूकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने कृष्णा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
सामना संपल्यानंतर मुकाई चौक बसस्टॉपकडून किवळे अंडरपासमार्गे मुंबई तसेच किवळे बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येईल. या मार्गावरील वाहने मुकाई चौक येथून डावीकडे वळून समीर लॉन्स किवळे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील. मामुर्डी ते कानेटकर बंगला तसेच मामुर्डी ते गहुंजे स्टेडियमकडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना 31 जानेवारी रोजी दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे. (Pune News )
कृष्णा चौक ते मामुर्डी अंडरपास मार्गे तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गाचे शेजारील मामुर्डी गावाच्या बाजूने असलेल्या सर्विस रोडने गहुंजे स्टेडियमकडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना 31 जानेवारी रोजी दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे. प्रेक्षकांनी या वाहतूक बदलांची नोंद घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे.
Title : Pune News India vs England T20 Match Traffic Diversions Near Gahunje Stadium Pune






