Pune News | पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि पुणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मोठे सर्च ऑपरेशन राबवले. या कारवाईने केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात खळबळ उडाली आहे. एकीकडे तपास यंत्रणांची छापेमारी सुरू असतानाच, दुसरीकडे कोंढवा परिसरातील अनेक गल्लीबोळांमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’चे बॅनर झळकताना दिसले आहेत. (Kondhwa Search Operation)
या छापेमारीचा आणि या बॅनरबाजीचा काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस या दिशेनेही तपास करत आहेत. परिसरात पोलीस फिरत आहेत, त्याच रस्त्यांवरती दोन ते तीन ठिकाणी ‘आय लव मोहम्मद’चे बॅनर लावल्याचे निदर्शनास येत आहे.
मोठा फौजफाटा तैनात :
ही कारवाई आणि बॅनर यांचा आपापसात काही संबंध आहे का? असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. जवळपास हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी कोंढवा परिसरात तैनात आहेत. जवळपास २५ ठिकाणी हे कारवाई सुरू आहे, दुसऱ्या बाजूला हे बॅनर पाहून यामुळेच ही कारवाई सुरू असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. (Kondhwa Banner)
याच परिसरापासून काही अंतरावर असलेल्या एका सोसायटीमध्ये दोन वर्षांपूर्वी दहशतवादी राहत होते. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दहशतवादी राहत असलेली जागा, सील करण्यात आली होती. या घटनेनंतर सील करण्यात आलेल्या सोसायटीजवळच्या जागेवरही पुणे पोलीस आणि एटीएसची पथके छापे मारत आहेत.
Pune News | मागील दहशतवादी कनेक्शन :
दहशतवादी कारवायांच्या संदर्भात कोंढवा परिसर यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. २०२३ मध्ये दोन वर्षांपूर्वी याच कोंढवा भागात आयसिस (ISIS) संबंधित तीन संशयितांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि ड्रोन मटेरिअल जप्त करण्यात आले होते. त्यामुळे देशातील मोठा कट उधळण्यात आला होता. तपास यंत्रणांच्या नजरेत पुन्हा काही संशयित आल्याने ही मोठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.






