पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा धोका वाढला; डॉक्टरांनी दिलेल्या माहितीने टेंशन वाढलं

On: January 22, 2025 10:29 AM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुण्यात दुर्मिळ अशा गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barre Syndrome) या आजाराने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत या आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या 24 वर पोहोचली असून, यापैकी 10 रुग्ण व्हेंटिलेटरवर (Ventilator) असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. या रुग्णांमध्ये लहान मुले आणि तरुणांचा समावेश असल्याने पालकांची चिंता आणखी वाढली आहे. (Pune News)

मंगळवारी 22 संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती, त्यात आता आणखी वाढ झाली आहे. या सर्व रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या आजाराचा सर्वाधिक धोका 12 ते 30 वयोगटातील नागरिकांना असल्याचे समोर आले आहे.

रुग्णांची स्थिती आणि डॉक्टरांचे मत

पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) या आजाराचे 16 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 10 रुग्ण तरुण असून, 6 रुग्ण लहान मुले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या 16 रुग्णांपैकी 10 जणांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. समीर जोग (Dr. Sameer Jog) यांनी दिली आहे. “मी अशाप्रकारे जीबीएस (GBS) या रुग्णसंख्येत झालेली वाढ कधीच पाहिलेली नव्हती. कोरोना (Corona) सारख्या महामारी दरम्यान देखील इतकी रुग्णसंख्या वाढली नव्हती. तसेच याआधी रूग्णालयात या आजाराचे एक-दोन रुग्ण आढळायचे. पण एका आठवड्यात 24 रूग्ण सापडणे हा आकडा खूप मोठा आहे,” असे पूना हॉस्पिटलचे (Poona Hospital) न्यूरोलॉजिस्ट (Neurologist) सुधीर कोठारी (Sudhir Kothari) यांनी सांगितले.

आरोग्य विभागाची (Health Department) तत्परता

या दुर्मिळ आजाराने बाधित रुग्णांची तपासणी केली जात आहे. तसेच रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल होते त्या परिसरातील इतर रुग्णांचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे (Dr. Neena Borade) यांनी दिली आहे. या संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्हीकडे (NIV) पाठवण्यात आले आहेत.

डॉ. बोराडे यांनी नागरिकांना धीर देताना सांगितले की, “या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचे कारण नाही. हा संसर्गजन्य (Contagious) आजार नाही. या आजारासाठी वेगळी ट्रीटमेंट (Treatment) लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते तीच दिली जाते. त्यामुळे लवकरात लवकर बरा होणारा हा आजार आहे.” (Pune News)

सतर्कता बाळगण्याचे आवाहन

जीबीएस (GBS) हा दुर्मिळ आजार असला तरी, त्याची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय आहे. नागरिकांनी या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (Pune News)

Title : Pune News GBS Outbreak 10 on Ventilator

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now