कोथरूडमध्ये 40 डुकरांचा मृत्यू; पुण्यातील घटनेनं मोठी खळबळ

On: February 13, 2025 3:59 PM
Pune News Forty Pigs Die in Kothrud Jaundice Suspected
---Advertisement---

Pune News | पुणे शहरातील कोथरूड (Kothrud) परिसरात गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यापैकी एका डुकराचा मृत्यू काविळीमुळे (Jaundice) झाल्याची प्राथमिक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी डुकराच्या शवविच्छेदनाचे नमुने भोपाळ (Bhopal) येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. (Pune News)

शवविच्छेदन अहवालातील माहिती

भारतीनगर, भिमाले टॉवर, कोथरूड परिसरातील नाल्याजवळ गेल्या काही दिवसांत डुकरांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. ६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ४० डुकरांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.

या परिसरातील ७८ डुकरे विलगीकरणात ठेवण्यात आली आहेत. काही डुकरांचे रक्तनमुने तपासण्यात आले, परंतु ते ‘निगेटिव्ह’ आले. बुधवारी राज्य पशुसंवर्धन विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एका डुकराचे शवविच्छेदन केले असता, त्यात काविळीची लक्षणे आढळली. त्यामुळे अधिक तपासणीसाठी नमुना भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

पशुसंवर्धन विभागाची माहिती

सहायक आयुक्त, राज्य पशुसंवर्धन विभाग, डॉ. बाळासाहेब गायकवाड (Dr. Balasaheb Gaikwad) यांनी सांगितले की, “एका डुकराचा मृत्यू काविळीने झाल्याची प्राथमिक माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे. डुकराच्या शवविच्छेदनाचे नमुने भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या अहवालातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.” (Pune News)

डुकरांचे रक्त नमुने घेऊन आफ्रिकन स्वाईन फिव्हर (African swine fever), स्वाईन फिव्हर, जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis) या तीन आजारांची तपासणी करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले. या परिसरात कोणताही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पाच किलोमीटर परिसरात फवारणी करण्यात आली आहे. या परिसरात काही जण डुकरे पाळत असल्याची माहिती समोर आली आहे, मात्र मृत डुकरांची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. याबाबत शोध सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Title : Pune News Forty Pigs Die in Kothrud Jaundice Suspected

 

Join WhatsApp Group

Join Now