पत्नीच्या छळाला वैतागलेल्या पतीला दिलासा; न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

On: January 22, 2025 11:14 AM
Pune News Divorce Granted Within a Year of Marriage
---Advertisement---

Pune News | लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या पतीने कौटुंबिक न्यायालयात (Family Court) धाव घेऊन घटस्फोटाची (Divorce) मागणी केली. न्यायालयाने पती-पत्नीच्या परस्पर संमतीनंतर अवघ्या एका वर्षातच घटस्फोट मंजूर करत सहा महिन्यांचा फेरविचाराचा कालावधीही (Cooling off Period) वगळला. (Pune News)

सुरेश आणि सविता (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा विवाह ६ डिसेंबर २०२३ रोजी झाला. लग्नानंतर अवघ्या १४ दिवसांतच या जोडप्यामध्ये खटके उडू लागले.  सविताला लग्न करायचे नव्हते, ही बाब तिने लग्नानंतर सुरेशला बोलून दाखवली.

पत्नीकडून छळवणुकीचा आरोप

“मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते; पण घरच्यांनी जबरदस्तीने लावून लावले. त्यामुळे माझी बहीण जसा सासू-सासऱ्यांना त्रास देते, तसा त्रास मी तुला आणि तुझ्या आई-वडिलांना देणार आहे,” असे धमकावत तिने पतीचे केस ओढून त्याला नखांनी ओरबाडले”, असा आरोप पतीने केला आहे.

सुरेशने समजावण्याचा प्रयत्न करूनही सविता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मिळण्यासाठी अॅड. निखिल कुलकर्णी (Adv. Nikhil Kulkarni) यांच्यामार्फत पुण्याच्या (Pune) कौटुंबिक न्यायालयात (Family Court) दावा दाखल केला.

कोर्टाने काय निर्णय दिला?

पत्नी नांदण्यास येत नसल्याने पतीने १९ एप्रिल २०२४ ला क्रूरतेच्या आधारे घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी २१ डिसेंबरला संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पती-पत्नीने काही अटींवर परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दोघांनाही पुन्हा एकत्र येणे शक्य नव्हते. त्यांचे वय कमी असून, पुढील आयुष्याचा विचार करता सहा महिन्यांचा फेरविचाराचा कालावधी (Cooling off Period) वगळण्यात यावा, अशी मागणी त्यांनी वकिलांमार्फत केली. हा युक्तीवाद ग्राह्य धरून कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश के. व्ही. ठाकूर (Judge K. V. Thakur) यांनी हा दावा निकाली काढला.

Title : Pune News Divorce Granted Within a Year of Marriage

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now