Pune News | पुणे शहरातील येरवडा (Yerwada) परिसरातील नगर रस्त्यावर (Nagar Road) सोमनाथनगर फाटा ते खराडीपर्यंतच्या बीआरटी (BRT) मार्गात अवजड वाहने घुसून अपघात होत आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी हा उर्वरित बीआरटी मार्ग तातडीने काढून टाकण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Pune News)
अपघातांचे वाढते प्रमाण
सुनील टिंगरे यांनी नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बीआरटी मार्ग काढून टाकण्याचा सातत्याने प्रयत्न केला. या प्रकरणी विधिमंडळात आवाज देखील उठवला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आदेशानंतर येरवडा पर्णकुटी ते सोमनाथनगर चौकापर्यंतची बीआरटी मार्गिका काढण्यात आली. मात्र, पुढे सोमनाथनगर चौक ते खराडीपर्यंतचा बीआरटी मार्ग अद्याप तसाच आहे.
नगर रस्त्यावर चंदननगर (Chandannagar) भुयारी मार्गाच्या बीआरटी मार्गात मंगळवारी पहाटे टँकर घुसून अपघात झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त टँकर उचलून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते, त्यामुळे दुपारपर्यंत नगर रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. (Pune News)
मागणी आणि इशारा
नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात सातत्याने अपघात होत असल्यामुळे, महापालिकेने (Municipal Corporation) नगर रस्त्यावरील उर्वरित बीआरटी मार्ग काढून टाकावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. अन्यथा जन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा सुनील टिंगरे यांनी प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान, पुणे नगर महामार्गावरुन रोजचा प्रवास करणारांसाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या भागात नेहमी होणारी वाहतूक कोंडी स्थानिकांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय झाला आहे. उन्नत मार्ग होईल तेव्हा होईल मात्र त्याआधी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
Title : Pune News Demand to Remove Remaining BRT Route on Nagar Road






