पुणेकरांनो सावधान!!! ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार समोर, महिलेला 13 लाखांना गंडा

On: January 22, 2025 10:53 AM
Cyber Fraud
---Advertisement---

Pune News | पुण्यामध्ये फसवणुकीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. बनावट पोलिसांमार्फत एका महिलेला भीती दाखवून लुटण्यात आले, तर दुसऱ्या घटनेत शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका नागरिकाची फसवणूक करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये मिळून तब्बल २९ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. (Pune News )

पहिल्या घटनेत, पाषाण (Pashan) परिसरात राहणाऱ्या एका महिलेला सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminals) लक्ष्य केले. गुन्हेगारांनी स्वतःला मुंबई गुन्हे शाखेतील (Mumbai Crime Branch) अधिकारी भासवून, महिलेच्या बँक खात्याचा (Bank Account) वापर आर्थिक गैरव्यवहारासाठी (Financial Fraud) होत असल्याचे सांगितले आणि कारवाईची भीती घातली.

कारवाईच्या भीतीने महिलेने गमावले १३ लाख

बनावट पोलिसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने घाबरून ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) टाळण्यासाठी बँक खात्यांची पडताळणी करण्यास होकार दिला. गुन्हेगारांनी सांगितल्याप्रमाणे तिने त्यांच्या खात्यात तब्बल १३ लाख २३ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात (Baner Police Station) तक्रार दाखल केली. वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप (Navnath Jagtap) या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Pune News )

गुंतवणुकीच्या आमिषाने १७ लाखांचा गंडा

दुसऱ्या एका घटनेत, शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी पाषाण (Pashan) येथीलच एका व्यक्तीला १७ लाख ३२ हजार रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात (Baner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायबर गुन्हेगार नवीन नवीन पद्धती वापरून नागरिकांना फसवणूक करत असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. (Pune News )

Title : Pune News Cyber Criminals Loot Lakhs in Pune

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now