पुण्यात दूषित पाणीच ठरतंय घातक; पाणी तपासणीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

On: February 10, 2025 12:24 PM
Mumbai
---Advertisement---

Pune News | पुणे जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (Guillain-Barré Syndrome – GBS) रुग्ण आढळून आल्यानंतर, दूषित पाण्याचा (Contaminated Water) मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरोग्य विभागाने (Health Department) केलेल्या तपासणीत शहरातील तब्बल 55 पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (Pune News)

पाणी तपासणीचा अहवाल

आरोग्य विभागाने पुणे शहर आणि सिंहगड रस्ता (Sinhagad Road), किरकटवाडी (Kirkatwadi), खडकवासला (Khadakwasla), धायरी (Dhayari), नांदेड गाव (Nanded Village) या परिसरातील पाण्याच्या 4661 नमुन्यांची तपासणी केली. यामधील 55 नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे निदान झाले आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (National Institute of Virology – NIV) तपासणीत काही रुग्णांच्या नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस (Norovirus) आणि ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ (Campylobacter jejuni) आढळून आले आहेत. नोरोव्हायरस आणि ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ यांचा संसर्ग दूषित पाणी आणि अन्नाच्या माध्यमातून होण्याची शक्यता असते.

सुरुवातीला शहरातील पाणी शुद्ध असल्याचा दावा महापालिका (Municipal Corporation) आणि आरोग्य विभागाने केला होता. मात्र, प्रत्यक्ष तपासणीमध्ये जलशुद्धीकरण प्रक्रियेतच (Water Purification Process) त्रुटी असल्याचे समोर आले. त्यानंतर, महापालिका आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आणि संबंधित भागात तातडीने जलशुद्धीकरण केंद्र उभारणार असल्याचे जाहीर करावे लागले. (Pune News)

नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करणार

आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांमध्ये (Districts)  नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून लवकरच नवीन मार्गदर्शक सूचना (Guidelines) जाहीर करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे.

Title : Pune News Contaminated Water in Pune 55 Samples Found Unfit for Drinking

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now