Pune News | राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. जून महिन्यात पावसाळा सुरु होताच राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. दरम्यान 4 जून रोजी पुण्यात पावसाने हजेरी लावली आली. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे पुणेकरांची दमछाक झाल्याचं चित्र पहायला मिळालं. एवढंच नाही तर पुण्यातील अनेक भागांना पावसाने चांगलंच झोडपून काढला. पुणे शहरातील धानोरी या भागात अक्षरशः पूरसदृश्य पाऊस झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
नेमकं काय घडलं?
पुणे शहरात दुपारी पावसाने पुणे शहरातील विश्रांतवाडी, धानोरी, विमानगर यासारख्या अन्य भागात जोरदार हजेरी लावली. यावेळी धानोरी परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानंतरची पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. स्थानिक लोकांच्या दुकानदारांचा मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.
रस्त्यावर पाणी आल्याने या ठिकाणची जनजीवन विस्कळीत झाली आहे. या भागात राहत असलेल्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. एवढंच नाही तर धानोरीतील काही भागात गेल्या काही दिवसांपासून विजपुरवठा खंडीत होत असल्यानं इथल्या स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. महापालिकेकडून पावसापूर्वीची कामं का झाली नाहीत?, असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल-
#धानोरी #पुणे
एका तासाच्या पावसाने पुण्यात दाणादाण #पाऊस pic.twitter.com/dcJBfjucXw— Sambhaji Patil (@psambhajisakal) June 4, 2024
पुण्यात पहिलाच पाऊस झाला आणि तो फार कमी वेळेसाठी तरी देखील या ठिकाणी एवढं पाणी कसं काय झालं असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. महापालिकेनं नेमकं काय काम केलं आणि मान्सूनपूर्वी काय तयारी केली आहे, असा सवाल देखील विचारला गेला आहे. धानोरी भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरुप आलं आहे. रस्त्यावर उभ्या चार चाकी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.
News Title : Pune News Cloudburst like rain
महत्त्वाच्या बातम्या-
ड्रीम गर्ल ते ड्रामा क्वीन..’या’ बॉलीवुड कलाकारांनी राजकीय मैदानही गाजवलं
‘या’ तारखेला होणार शपथविधी, मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान?
आता निलेश लंके सुद्धा इंग्रजीत बोलणार!, खासदार झाल्यानंतर केली मोठी घोषणा
मोठी बातमी! नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा
आशिष शेलार पडले तोंडावर, किरण मानेंनी व्हिडीओ शेअर करत डिवचलं






