Pune News | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 26 सप्टेंबररोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे होण्याच्या दृष्टिने अनेक ठिकाणी ड्रॉप पॉइंट तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. (Pune News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांनी ड्रॉप पॉईंटच्या ठिकाणी उतरावे, त्यांची वाहने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त आज दुपारी 3 वाजेपासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.
कोणते मार्ग बंद असणार?, पर्यायी मार्ग कोणते?
1. सावरकर पुतळा चौक ते सारस बाग – पुरम चौक दरम्यान रस्ते बंद असतील.
पर्यायी मार्ग : सिंहगड रोडवरून सावरकर चौक उजवीकडे वळण घेऊन मित्रमंडळ चौक ते व्होल्गा चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
– मित्रमंडळ चौक कडून सावरकर चौक डावीकडे वळण घेऊन सिंहगड रोड जंक्शन वरून इच्छित स्थळी जावे.
2. जेधे चौक ते सातारा रोड प्रवेश बंद राहील
पर्यायी मार्ग : टिळक रोड व शिवाजी रोडवरून येणाऱ्या वाहनांनी जेधे चौक मधून डावीकडे वळण घेऊन सेवन लव्हज चौक उजवीकडे वळण घेऊन वखार महामंडळ उजवीकडे वळण घेऊन मार्केट यार्ड जंक्शन वरून सातारा रोडला जावे. (Pune News)
3. सेवन लव्हज चौक ते जेधे चौक प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : सेवन लव्हज चौक डावीकडे वळण घेवून वखार महामंडळ उजवीकडे वळून सातारा रोड वरून इच्छित स्थळी जावे.
4. व्होल्गा चौक ते जेधे चौक प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : व्होल्गा चौक डावीकडे वळण घेऊन सावरकर चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.
– सातारा रोडवरील वाहने मार्केट यार्ड जंक्शन येथून उजवीकडे वळण घेऊन वखार महामंडळ चौक डावीकडे वळण घेऊन सेवन लव्हज चौकामधून इच्छित स्थळी जावे.
सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन परीसर
1. कामगार पुतळा ते शिवाजी चौक दरम्यान दोन्ही बाजुने प्रवेश बंद
पर्यायी मार्ग :- कामगार पुतळा ते शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
– शिवाजी चौक सरळ मंगला सिनेमा समोरून काँग्रेस हाऊस रोडवरून इच्छितस्थळी जावे. (Pune News)
2. तोफखाना चौक ते कोर्टाकडे प्रवेश बंद (रानडे पथ)
पर्यायी मार्ग : तोफखाना चौक डावीकडे वळण घेऊन महापालिकेसमोर खुडे चौकातून इच्छित स्थळी जावे.
आंबील ओढा परीसर
1) ना. सी. फडके चौक आणि नाथ पै चौकाचे प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग :- ना. सी. फडके चौक डावीकडे वळण घेऊन निलायम ब्रिज खालून सिंहगड रोडने इच्छित स्थळी जावे.
– नाथ पै चौक ते सरळ सिंहगड रोड जंक्शन वरून इच्छित स्थळी जावे.
2) बाबुराव घुले पथ पथावरुन टिळक कॉलेजच्या पुढे आंबील ओढा जंक्शन कडे प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग :- टिळक कॉलेज चौकातून उजवीकडे वळन घेऊन जॉगर्स पार्क रोडने शास्त्री रोडवर येऊन इच्छितस्थळी जावे. (Pune News)
ड्रॉप पॉईंट्स कोणते असणार?
दांडेकर पूल ते निलायम ब्रीज (सिंहगड मार्गावर)
सावरकर पुतळा ते निलायम ब्रीज
न्यू इंग्लिश स्कूल टिळक मार्ग ते विसावा मारुती
सणस पुतळा चौक ते पुरम चौक
स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार
नाथ पै चौक ते अलका चौक
अलका चौक ते भिडे जंक्शन (Pune News)
व्हीव्हीआयपी पार्किंग
पार्किंगची ठिकाणे कोणती?
भिडे पूल नदी पात्र (पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून)
निलायम टॉकीज
पाटील प्लाझा
विमलाबाई गरवारे शाळा
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड
आबासाहेब गरवारे महाविद्यालय
डी. पी. रोड, म्हात्रे पुलाजवळ
कटारिया हायस्कूल
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
मिनरर्व्हा पार्किंग मंडई
हरजीवन हॉस्पिटल, सावरकर चौक
हमालवाडा पार्किंग
पीएमपीएल मैदान, पुरम चौक (Pune News)
(मोदींच्या समारंभाला येणाऱ्या बसेससाठी डी. पी. रोड कोथरूड व शिवनेरी मार्ग, मार्केट यार्ड येथे पार्किंग व्यवस्था असेल.)
बससाठी पार्किंग कुठे असणार?
– खंडोजीबाबा चौक – टिळक चौक – सेनादत्त पोलिस चौकी – उजवीकडे वळण घेऊन म्हात्रे पूल डावीकडे डी. पी. रोड
– सावरकर चौकातून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पुलावरून सरळ राजाराम पूल – उजवीकडे वळण घेऊन डी. पी. रोड
– सिंहगड मार्गावरून येणाऱ्या बसेस दांडेकर पूल – सावरकर पुतळा – मित्रमंडळ चौक – व्होल्गा चौक – सातारा रोड मार्केट यार्ड जंक्शन वरून शिवनेरी रोड (Pune News)
News Title- Pune News Changes in transport today
महत्त्वाच्या बातम्या –
अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर?
आज जुळून आला गुरु पुष्य योग; ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळणार!
मुंबई पुन्हा तुंबली! मुसळधार पावसाने लोकल सेवा मंदावली, जनजीवनही विस्कळीत
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर






