PM मोदी उद्या पुण्यात; मंगळवारी ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

On: November 11, 2024 10:58 AM
Pune News Change in traffic tomorrow 
---Advertisement---

Pune News | पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 नोव्हेंबर, मंगळवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत.जाहीर सभेच्या माध्यमातून मोदी जनतेला संबोधित करतील. या सभेनिमित्त नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्थेत काही बदल केले आहेत. पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या पटांगणात पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे. (Pune News )

पंतप्रधान मोदी पुण्यात आल्यानंतर त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचा एकंदर प्रवास पाहता त्या अनुषंगाने पुणे शहरातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यातील 13 महत्त्वाच्या रस्त्यांवर मंगळवारी वाहतूक व्यवस्थेतील गैरसोय टाळण्यासाठी अवजड वाहनांना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

वाहतुकीत कोणते बदल करण्यात आले?

– नासी फडके चौक ते नाथ पै चौक प्रवेश बंद
पर्यायी मार्ग म्हणून नासी फडके चौकाकडून डावं वळण घेऊन निलायम ब्रिजखालून सिंहगड मार्गानं पुढे जावं
नाथ पै चौक ते सिंगगड रोड जंक्शनहून सरळ पुढे जाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. (Pune News )

– बाबुराव घुले मार्गावरून टिळक महाविद्यालयाच्या पुढे आंबील ओढा जंक्शनकडे प्रवेश बंद
पर्यायी मार्ग म्हणून टिळक महाविद्यालय चौकातून डाव्या वळणाने जॉगर्स पार्क मार्गाने शास्त्री मार्गाने इच्छित स्थळी जावं (Pune News )

तसेच पुण्यात टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) डावीकडे वळून भिडे पुल चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे. तसेच, डेक्कन जिमखाना परिसरातून भिडे पूलमार्गे केळकर रस्त्यावर येण्यास वाहनांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी नदीपात्रातील रस्त्याने इच्छितस्थळी जाण्याचा मार्ग खुला असेल.

News Title :  Pune News Change in traffic tomorrow 

महत्वाच्या बातम्या –

“फडणवीस तुमचे नाही तर आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले”; ओवैसींचा हल्लाबोल

कॉँग्रेसचा बंडखोरांना दणका, आबा बागुलांसह ‘या’ नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

चंद्रकांत पाटलांच्या विजयाबाबत मेधाताई कुलकर्णी यांना विश्वास; म्हणाल्या, “सर्वाधिक मताधिक्य..”

महादेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींची इच्छापूर्ती होणार!

“त्याने मला शारीरिक दुखापत केली…”, अखेर ऐश्वर्या राय स्पष्टच बोलली

Join WhatsApp Group

Join Now