पोलिसांचा धाक संपला??? पुण्यात महिला असुरक्षित, भरदिवसा मंगळसूत्र हिसकावण्याच्या दोन घटना

On: January 22, 2025 12:21 PM
Pune News Chain Snatching Incidents Rise in pune 
---Advertisement---

Pune News | पुणे (Pune) शहरात भरदिवसा महिलांचे मंगळसूत्र (Mangalsutra) आणि सोनसाखळी (Gold Chain) हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (२२ जानेवारी) सकाळी कर्वेनगर (Karvenagar) आणि कोथरूड (Kothrud) परिसरात अशा दोन घटना उघडकीस आल्या आहेत. (Pune News)

पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीतील (Navsahyadri Society) चंदन पथ (Chandan Path) येथे बुधवारी सकाळी ६.४२ वाजता मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावले. महिलेने आरडाओरडा केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. चोरटा पसार झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले असून, त्यात चोरटा मंगळसूत्र हिसकावताना दिसत आहे. मंगळसूत्र हिसकावताना अर्धा भाग तुटून खाली पडला. मात्र, चोरटा परत मागे आला व पडलेला भाग उचलून घेऊन गेला. (Pune News)

सोसायटीच्या पार्किंगमध्ये महिलेची सोनसाखळी लंपास

दुसऱ्या घटनेत, कोथरूड (Kothrud) भागातील डी. पी. रस्त्यावरील (D. P. Road) नचिकेत सोसायटीत (Nachiket Society) एका महिलेची सोनसाखळी चोरट्यांनी भरदिवसा हिसकावली. सायंकाळी ७.३० च्या सुमारास एक दाम्पत्य शतपावली करून घरी परतत असताना ही घटना घडली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये (Parking) प्रवेश करताच दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. महिलेच्या पतीने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलिसांकडून तपास सुरू; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

या दोन्ही घटनांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात (Police Station) करण्यात आली असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. पोलिसांनी नागरिकांना, विशेषतः महिलांना सतर्क राहण्याचे आणि दागिने घालून एकट्याने बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. (Pune News)

Title  : Pune News Chain Snatching Incidents Rise in pune 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now