पुणे हादरलं! ‘या’ भागात ATS चे छापे; दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश?

On: October 9, 2025 11:23 AM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुण्यातील कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मोठे सर्च ऑपरेशन राबवले. दहशतवादी कारवायांशी संबंधित संशयितांच्या माहितीवरून ही धडक कारवाई करण्यात आली. कोंढवा परिसरासह २५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या मोहिमेत १८ संशयित व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून, त्यापैकी काहींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

या कारवाईने केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कोंढवा परिसरातून अटक केली होती. त्यानंतर देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात यश आलं होतं. त्याच भागात आता पुन्हा काही संशयित तपास यंत्रणांच्या नजरेत आले आहेत.

सिम कार्ड आणि लॅपटॉप ताब्यात

हे संयुक्त सर्च ऑपरेशन असून त्यात महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणा एकत्रितपणे काम करत आहेत. शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर तपशील अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल, असं पोलिस सूत्रांनी सांगितलं. एटीएसने दहशतवाद्यांशी संबंधित काही मोबाईलचे सिम कार्ड आणि लॅपटॉप ताब्यात घेतले आहेत. या कारवाईसाठी ३५० हून अधिक पोलिस अधिकारी व एटीएससह पुणे पोलिस यांची मोठी फौज तैनात करण्यात आली होती.

दहशतवादी कारवायांच्या संदर्भात कोंढवा परिसर यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. २०२३ मध्ये दोन वर्षांपूर्वी याच कोंढवा भागात आयसिस (ISIS) संबंधित तीन संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि ड्रोन मटेरिअल जप्त करण्यात आले होते. २०२४ मध्येच वर्षी एटीएसने कोंढव्यात बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा भांडाफोड करून ३,७८८ सिमकार्डे जप्त केली होती. हे नेटवर्क दहशतवादी संवादासाठी वापरले जात असल्याचा संशय होता. (Pune news)

Pune News | कडेकोट पोलिस बंदोबस्त

दरम्यान मध्यरात्री १२ नंतर सुरू झालेली ही मोहीम पहाटे ५ वाजेपर्यंत चालू होती. कोंढवा सह २५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी १८ संशयितांचा शोध घेण्यात आला यापैकी काहींना ताब्यात घेतले. कारवाईपूर्वी मोठी गुप्तता बाळगण्यात आली. सध्या परिसारत कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. कोंढवा येथील घनदाट वस्ती, मजूर वसाहती आणि बांगलादेशी घुसखोरांची उपस्थिती यामुळे संशयितांना लपण्यास सोपे जाते, असे तपास यंत्रणांचे मत आहे.
या मोठ्या कारवाईमुळे पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

News Title- Pune News ATS action in Pune kondhva

Join WhatsApp Group

Join Now