पुण्यात जीबीएसचं थैमान, रुग्णसंख्या 200 पार तर आणखी एकाचा मृत्यू

On: February 13, 2025 11:12 AM
Pune News 200 cases of GBS
---Advertisement---

Pune News | पुण्यात गुईलेन बॅरी सिंड्रोमने थैमान घातले आहे. दररोज याची रगण संख्या वाढतच चालली आहे.तर, गेल्या 24 तासांत जीबीएसच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत जीबीएसमुळे 8 जणांचा बळी गेला आहे. राज्यभरात याची रुग्णसंख्या आता 200 पर गेली आहे. (Pune News)

आत्तापर्यंत 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातून 54 रुग्णावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तर 20 जण व्हेंटिलेटवर आहेत. जीबीएसची राज्यातील रुग्णसंख्या 203 इतकी झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 203 रुग्णांपैकी 94 रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत.

पुण्यात GBS चा धोका वाढला

त्याचबरोबर 41 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, 31 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि 8 रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सध्या 52 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

बुधवारी (12 फेब्रुवारी) खडकवासला भागातील 59 वर्षीय पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. या रुग्णाला 10 फेब्रुवारी रोजी नवले हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.11 फेब्रुवारी रोजी रुग्णाला कार्डिअ‍ॅक अरेस्टचा त्रास झाला. उपचारा दरम्यान या रुग्णाचा मृत्यू झालाय.

गुईलेन बॅरी सिंड्रोमची लक्षणे-

– पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
– अचानकपणे उद्भवलेला चालण्‍यातील त्रास किंवा अशक्तपणा
– जास्‍त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप (Pune News)

काय काळजी घ्याल?

– पाणी स्वच्छ उकळून प्‍या
-स्वच्छ व ताजे अन्न खावे
– शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये
– वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
– हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या (Pune News)

Title : Pune News 200 cases of GBS

Join WhatsApp Group

Join Now