पुण्याच्या नांदेड सिटी आणि परिसरातील नागरिक हैराण, ‘या’ आजारानं काढलं डोकं वर

On: January 20, 2025 8:10 PM
Nanded City
---Advertisement---

पुणे: पुण्यातील नांदेड सिटी (Nanded City, Pune) आणि आजूबाजूच्या परिसरात पोटदुखीच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोटदुखी तसेच तत्सम इतर लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे.

नांदेड सिटी, नांदेड गाव(Nanded, Pune), किरकिटवाडी(Kirkitwadi), शिवणे(Shivane), कोंढवे-धावडे, धायरी(Dhayari), डीएसके विश्व(DSK Vishwa), सिंहगड रोड(Sinhagad Road), उत्तरनगर(Uttamnagr, Pune) या भागात या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. रुग्णांमध्ये विविध वयोगटातील लोकांचा समावेश आहे.

अनेक जण दुखणे अंगावर काढत असल्याने त्यांचा त्रास अधिकच वाढत चालला आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर, नांदेड सिटी येथील कोरडेबागमधील वर्पे क्लिनिकच्या (Varpe Clinic, Nanded City) डॉ. अश्विनी पाटील यांनी नागरिकांना महत्वाचा सल्ला दिला आहे. “नागरिकांनी बाहेरचे पदार्थ खाताना विशेष काळजी घ्यावी. पोटदुखी किंवा इतर कोणतीही लक्षणे आढळल्यास ती अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,” असे आवाहन डॉ. अश्विनी पाटील( Dr. Ashwini Patil-Varpe) यांनी केले आहे.

पोटदुखी वाढण्याची संभाव्य कारणे:

पोटदुखीच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ अनेक कारणांमुळे असू शकते. खालील काही संभाव्य कारणे आहेत:

  1. दूषित पाणी: अशुद्ध पाणी प्यायल्याने जंतूसंसर्ग होऊन पोटदुखी, जुलाब, उलट्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
  2. अस्वच्छ अन्न: उघड्यावरील अन्नपदार्थ, अस्वच्छ पद्धतीने बनवलेले अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होऊ शकते. रस्त्यावरील विक्रेत्यांकडून अन्नपदार्थ घेताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
  3. हवामानातील बदल: वातावरणातील बदलांमुळे विषाणूजन्य संसर्ग (Viral Infection) वाढू शकतात, ज्यामुळे पोटदुखी, सर्दी, खोकला यांसारखे आजार उद्भवतात.
  4. वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव: जेवणापूर्वी हात न धुणं, अस्वच्छ ठिकाणी राहणं यामुळे जंतूंचा प्रसार होऊन पोटदुखी होऊ शकते.
    पोटदुखी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय:

खालील उपाययोजना अंमलात आणणे गरजेचे-

  1. पाणी उकळून व गाळून प्यावे: पाणी कमीत कमी २० मिनिटे उकळून आणि त्यानंतर गाळून प्यावे. यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होण्यास मदत होईल.
  2. बाहेरचे खाणे टाळावे: शक्यतो घरचे ताजे अन्न खावे. बाहेरचे खाणे टाळावे, विशेषतः उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत.
  3. फळे व भाज्या स्वच्छ धुवून खाव्यात: बाजारातून आणलेल्या फळे आणि भाज्या मिठाच्या पाण्यात काही वेळ भिजत ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून खाव्यात.
  4. वैयक्तिक स्वच्छता राखावी: जेवणापूर्वी आणि शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
    परिसर स्वच्छ ठेवावा: घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. साचलेले पाणी त्वरित काढून टाकावे, कारण ते डासांच्या प्रजननाचे ठिकाण बनते.
  5. लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा: पोटदुखी, जुलाब, उलट्या यांसारखी लक्षणे आढळल्यास ती अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पोटदुखीच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वरील उपाययोजनांचा अवलंब केल्यास पोटदुखीचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now