Pune Railway News | नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विविध मार्गांवर स्पेशल गाड्या (Special Train) चालवण्याची तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त दरवर्षी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदाही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, प्रवाशांची सोय सुनिश्चित करण्यासाठी पुणे – नागपूर (Nagpur) मार्गावर विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
विशेष गाडीची माहिती :
-पुणे ते नागपूर जाणारी गाडी 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.5 वाजता पुणे रेल्वे स्थानकातून सुरू होईल.
– नागपूरकडे परत येणारी गाडी 2 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता नागपूरहून रवाना होईल.
गाडीत एकूण 18 डबे असतील, ज्यापैकी 16 डबे आरक्षणाशिवाय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत, जेणेकरून मोठ्या संख्येने प्रवासी सहज प्रवास करू शकतील.
Pune Railway News | गाडी थांबणाऱ्या प्रमुख स्थानकांची यादी :
पुणे, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मल्कापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, अजनी या स्थानकांवर गाडी थांबेल.
तसेच रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक थांबणे टाळण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षिततेची काळजी घेण्यास प्रवाशांनी दक्षता घ्यावी, अश्या सूचना प्रवाशांना दिल्या आहेत. ही विशेष सेवा उपलब्ध झाल्यामुळे पुणे व आसपासच्या भागातील अनुयायांना नागपूरला जाण्यास मोठी सोय होणार असून, प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.






