Pune Crime | राज्य सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर बारामतीच्या (Baramati) एका उद्योगपतीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हडपसर (Hadapsar) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने पीडितेचे शोषण केल्याचा आरोप आहे.
नोकरीचे आमिष आणि जाळ्यात ओढले :
पीडित तरुणीने २०२० मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्यसेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे (Pune) येथे अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये तिची बारामती (Baramati) येथे आरोपी मनोज कुंडलिक तुपे (Manoj Kundlik Tupe) याच्याशी ओळख झाली. तुपेने स्वतःची ओळख मोठा उद्योगपती अशी करून देत, तिला व तिच्या मैत्रिणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले आणि तिचा मोबाईल नंबर घेतला. यानंतर दोघांमध्ये सातत्याने फोनवरून बोलणे सुरू झाले.
मे २०२१ मध्ये पीडिता पुण्यात (Pune) अभ्यासासाठी राहायला आली. ऑगस्ट २०२१ मध्ये, आरोपी तुपेने तिला जेवणासाठी बोलावले आणि हडपसरला (Hadapsar) सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. गाडीतळाजवळ आल्यावर त्याने गाडीतच तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार २०२१ पासून १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहिला. यानंतरही आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील विविध हॉटेल्समध्ये नेत तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
Pune Crime | लग्नास नकार आणि ब्लॅकमेलिंगचा वापर :
ऑक्टोबर २०२२ मध्ये पीडित तरुणीचे लग्न झाले, मात्र ऑगस्ट २०२३ पासून तिने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पीडिता तणावात असतानाच आरोपीने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला. “संपर्क तोडू नकोस, आपण लग्न करू,” असे आश्वासन देत त्याने पीडितेसोबत पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.
जुलै २०२५ पासून पीडितेने लग्नाचा विषय काढताच आरोपी चिडू लागला व भांडणे काढू लागला. “माझे समाजात नाव आहे, मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही,” असे म्हणत त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. पीडितेने पोलीस तक्रार करण्याची धमकी देताच, आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले. यानंतरही त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि संबंधानंतर तिला गोळ्या (Pills) खायला दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.






