पुण्यात म्हाडाचं घर घेतायं ? तर जाणून घ्या लॉटरीचा फॉर्म भरण्यासाठी किती रुपये लागतील

On: September 18, 2025 10:16 AM
MHADA Lottery 2025
---Advertisement---

Pune MHADA Lottery | पुण्यातील म्हाडा मंडळाने ६१६८ घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. यापैकी १९८२ घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराला ठरावीक अनामत रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम उत्पन्न गटानुसार वेगवेगळी आहे. अर्जासोबत ६०० रुपये अर्ज शुल्क व त्यावर १८% जीएसटी म्हणजेच १०८ रुपये आकारले जातील. ही फी विना परतावा आहे. (Pune MHADA Lottery)

अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी :

अल्प उत्पन्न गट :

अनामत रक्कम -10,000 रुपये
अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क रुपये 600 + जीएसटी 18 % रुपये 108 = एकूण 708 (विना परतावा)
एकूण – 10,708 रुपये

अत्यल्प उत्पन्न गट :

अनामत रक्कम – 20,000 रुपये
अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क रुपये 600 + जीएसटी 18 % रुपये 108 = एकूण 708 (विना परतावा)
एकूण – 20,708 रुपये (Pune MHADA Lottery)

मध्यम उत्पन्न गट :

अनामत रक्कम – 30,000 रुपये
अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क रुपये 600 + जीएसटी 18 % रुपये 108 = एकूण 708 (विना परतावा)
एकूण – 30,708 रुपये

उच्च उत्पन्न गट :

अनामत रक्कम – 40,000 रुपये
अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क रुपये 600 + जीएसटी 18 % रुपये 108 = एकूण 708 (विना परतावा)
एकूण – 40,708 रुपये

अर्ज कसा कराल? :

लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी MHADA ची अधिकृत वेबसाईट किंवा MHADA Lottery अॅप वापरता येईल. घरांच्या किमती, अर्ज प्रक्रिया आणि अधिकृत जाहिरात पीडीएफ याबाबतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.

News Title: Pune MHADA Lottery 2025: Deposit Amount for Application – EWS, LIG, MIG, HIG Details

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now