Pune MHADA Lottery | हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. म्हाडा (MHADA) पुणे जिल्ह्यात सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी भव्य प्रकल्प उभारणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तब्बल 13,301 घरांचे बांधकाम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, पुढील चार वर्षांत ही घरे नागरिकांच्या स्वाधीन केली जाणार आहेत.
खेड व मुळशी तालुक्यात प्रकल्प :
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रोहकल येथे सुमारे ८,००० घरे तर मुळशी तालुक्यातील नेरे येथे ५,३०१ घरे उभारली जाणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी जवळपास २,१९४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाने म्हाडाकडे ५७ एकर गायरान जमीन सुपूर्द केली असून, या जमिनीवर टप्प्याटप्प्याने बांधकाम सुरू होईल. (Pune MHADA Lottery)
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारली जाणारी ही घरे सामान्य कुटुंबांना लक्षात घेऊन डिझाईन केली जाणार आहेत. परवडणाऱ्या किमतीत आधुनिक सुविधा मिळणार असल्यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना घरकुलाचं स्वप्न साकार करणारी ठरेल.
Pune MHADA Lottery | ठाणे-पालघर प्रकल्पांना प्रचंड प्रतिसाद :
पुण्यातील प्रकल्पाबरोबरच म्हाडाच्या कोकण मंडळातील इतर गृहनिर्माण योजनांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठाणे शहर, जिल्हा आणि पालघरमधील वसई येथे उपलब्ध करून दिलेल्या ५,२८५ सदनिका व भूखंडांसाठी तब्बल १,२५,३९७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ८९,००० हून अधिक अर्जदारांनी अनामत रक्कमही भरली आहे.
म्हाडाच्या विविध प्रकल्पांमधील गाळ्यांच्या ई-लिलावासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक अर्जदारांना ८ सप्टेंबरपर्यंत नोंदणी, ऑनलाइन अर्ज आणि कागदपत्रे अपलोड करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांना या योजनेत सहभागी होता येईल. (Pune MHADA Lottery)
या नव्या उपक्रमामुळे पुणेकरांसाठी घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या या प्रकल्पामुळे केवळ घरांची उपलब्धता वाढणार नाही, तर गृहबाजारातही परवडणाऱ्या घरांची मागणी पूर्ण होण्यास मदत होईल.






