Pune Metro | पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आता ड्रायव्हरलेस मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. सुरुवातीला ही सेवा खडकवासला ते खराडी या मुख्य मार्गावर सुरु होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे मानवी चुका टळतील, वेळेवर सेवा मिळेल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरळीत व सुरक्षित होईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Pune Metro Driverless)
सध्याच्या फेज-१ मध्ये ATO (Attended Train Operation) मोड आहे, ज्यामध्ये चालक सिग्नलिंग व सुरक्षिततेवर लक्ष ठेवतो. मात्र, फेज-२ मध्ये UTO (Unattended Train Operation) मोड लागू होणार असून यात ट्रेन पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने धावतील. ड्रायव्हरची गरज भासणार नाही. (Automated Pune Metro)
३१.६ किमीचा मार्ग, २८ स्थानके :
फेज-२ अंतर्गत लाईन-४ ची लांबी ३१.६ किलोमीटर असून २८ स्थानके असतील. मुख्य मार्ग खडकवासला-खराडी असून नळस्टॉप-मानिकबाग या उपमार्गात ६ स्थानके असतील. ही लाईन वारजे, हडपसर, मगरपट्टा आणि स्वारगेटसारख्या भागांतून जाणार आहे. ड्रायव्हरलेस ऑपरेशन्ससाठी ७५ नवे कोचेस खरेदी करण्याची योजना असून अत्याधुनिक UTO आधारित सिग्नलिंग, सीसीटीव्ही, सायबर सुरक्षा, फायबर ऑप्टिक ट्रान्समिशन, प्रवासी माहिती प्रदर्शन प्रणाली, मास्टर क्लॉक, व्हॉईस रेकॉर्डिंग यांसारखी तंत्रज्ञान वापरली जाणार आहेत.
केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर ही सेवा लवकरच सुरू होईल. सुरुवातीला चालक निरीक्षणासाठी उपस्थित राहतील, मात्र प्रणाली स्थिर झाल्यावर पूर्णपणे ड्रायव्हरलेस ऑपरेशन केले जाईल.
Pune Metro | मुंबई-Delhi सारखा अनुभव पुणेकरांना :
ही आधुनिक संकल्पना फक्त पुण्यातच नाही तर मुंबई, दिल्लीसह इतर महानगरांमध्येही राबविण्यात येणार आहे. स्वयंचलित मेट्रोमुळे प्रवाशांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेवर सेवा मिळणार असून मानवी चुका टळतील. पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सोयीस्कर आणि प्रवासी-अनुकूल होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Pune Metro Driverless)
पुण्यातील ड्रायव्हरलेस मेट्रो ही शहराच्या विकासातील एक मोठी झेप ठरणार आहे. या आधुनिक सुविधेमुळे पुणेकरांचा प्रवासाचा अनुभव निश्चितच जागतिक स्तरावर नेणारा ठरेल.






