Pune Mayor Reservation | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही सोडत आज जाहीर झाली असून अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक शहरांमध्ये भाजपाकडे सत्ता आहे. त्यामुळे महापौरपदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
आरक्षण सोडतीनुसार पुणे महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे (Pimpri Chinchwad mayor) महापौरपदही सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी राखीव जाहीर झाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची चढाओढ वाढण्याची शक्यता आहे.
इतर महापालिकांमधील आरक्षण चित्र :
या सोडतीनुसार अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) ओबीसी महिला महापौर असणार आहे. कोल्हापूर (Kolhapur Mayor) आणि इचलकरंजी महापालिकेत महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. जळगाव महापालिकेचे महापौरपद महिला ओबीसीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. तसेच सोलापूर, सांगली, नाशिक, धुळे आणि मालेगाव महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.
राज्यातील 29 महापौरपदांसाठी आरक्षणाचे वर्गीकरण असे आहे. अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जातीसाठी 3, ओबीसीसाठी 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 महापालिका. यामुळे अनेक शहरांतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Pune Mayor Reservation | आरक्षणावर आक्षेप, राजकीय हालचालींना वेग :
आरक्षण सोडतीदरम्यान काही ठिकाणी आक्षेप नोंदवण्यात आले असून परभणी आणि मुंबई महापालिकेच्या आरक्षण प्रक्रियेवर विरोधकांनी हरकती घेतल्या आहेत. (Pune Mayor Reservation News)
ठाकरे गटाकडूनही सोडतीदरम्यान गोंधळ झाल्याचे सांगितले जात आहे. आता आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर सर्व पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत.






