मोठी दुर्घटना! पुण्यात ‘या’ ठिकाणी हेलिकॉप्टर क्रॅश

On: August 24, 2024 4:31 PM
Pune Helicopter Crash
---Advertisement---

Pune Helicopter Crash l पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी एक खाजगी हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. त्यामुळे गावाजवळील नागरिक भयभीत झाले होते.

पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ हेलिकॉप्टर क्रॅश :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ एक खाजगी हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबाद जात होत. या हेलिकॉप्टरमध्ये 4 प्रवासी होते. मात्र हे हेलिकॉप्टर कोणाचं आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. याशिवाय प्रवाशांबाबतची माहिती देखील समजू शकलेली नाही.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये 4 प्रवासी होते. मुंबईहून हैदराबादला जात असलेल्या खासगी विमान कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलीस एसपी पंकज देशमुख यांनी सांगितले की, अद्याप या घटनेबाबत कोणतीही जीवितहानी झाली नसून जीवितहानीचे मूल्यांकन केले जात आहे.

Pune Helicopter Crash l पायलट जखमी तर अन्य तीन जणांची प्रकृती स्थिर :

पुणे ग्रामीण पोलिस एसपी पंकज देशमुख यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमधील चार जणांपैकी कॅप्टन जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित तीन जणांची प्रकृती स्थिर आहे. हे हेलिकॉप्टर काही वेळ घोटावड्याच्या दिशेने आकाशात फिरत होतं. मात्र अचानक ते खाली पडल्याचा मोठा आवाज नागरिकांना आला.

घटनेवेळी स्थानिक आणि आजुबाजूचे लोक मदतीसाठी धावून आले. तसेच कोसळलेल्या हेलिकॉप्टरच्या आजूबाजुला न जाण्याचं आवाहन पायलटनी स्थानिक नागरिकांना केलं आहे. कारण या हेलिकॉप्टरचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो असं ते म्हणाले आहेत.

News Title – Pune Helicopter Crash News

महत्त्वाच्या बातम्या-

सरकारने 150 पेक्षा अधिक औषधांवर घातली बंदी; पाहा औषधांची यादी

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार का? वाचा सविस्तर

महाराष्ट्र हादरला! पुन्हा एका मुलीवर बलात्कार

राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा, आदित्य ठाकरेंविरोधात टाकला मोठा डाव?

पुणेकरांनो सावधान! तब्बल ‘इतके’ दिवस जिल्ह्याला पावसाचा अलर्ट

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now