पुण्याच्या धायरीतील GBS बाधित तरूणाचा सोलापुरात मृत्यू; अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

On: January 27, 2025 9:27 AM
Pune News
---Advertisement---

Pune News l पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome – GBS) बाधित एका तरुणाचा सोलापुरात (Solapur) मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला GBS ची लागण झाली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील डीएसके विश्व (DSK Vishwa) परिसरात राहणाऱ्या या तरुणाचा GBS मुळे मृत्यू झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असलेला हा तरुण पुण्यातील धायरी (Dhayari) परिसरातील डीएसके विश्व येथे राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याला GBS ची लागण झाली होती. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा तरुण बरा होऊन काही दिवसांपूर्वीच अतिदक्षता विभागातून (ICU) बाहेर आला होता. मात्र, श्वसनाचा त्रास (Breathing Problem) झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते.

अजित पवारांनी बोलावली बैठक; महापालिका आयुक्तांना सूचना :

पुण्यातून आलेल्या रुग्णाचा सोलापुरात मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीने पुण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

पुण्यातील दोन रुग्णालयांमध्ये GBS संदर्भात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच, महानगरपालिका अधिकाऱ्यांना पाण्याच्या नमुन्यांबाबत (Water Samples) सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

Pune News l उपचारादरम्यानच तरुणाचा मृत्यू :

सोलापुरात गेल्यानंतर या तरुणाला अशक्तपणा जाणवू लागल्याने त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्याला GBS ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान, ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ अर्थात GBS या आजाराच्या रुग्णांची पुणे शहरातील वाढती संख्या लक्षात घेता, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्याशी चर्चा करून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

News Title: pune-gbs-patient-dies-in-solapur-ajit-pawar-calls-urgent-meeting

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now