Ganpati 2024 l कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या बाप्पाचे आज आगमन होत आहे. गणेशभक्त अगदी वाजत गाजत बाप्पाचे आगमन करत असतात. मात्र यंदाच्या वर्षी गणेशोत्सव काळात काही नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक गणेशभक्तांसाठी ही बातमी महत्वाची आहे.
पुणे शहरात ‘या’ भागात दारू बंदी :
यंदाच्या वर्षी गणेशोत्सव काळात पुणे शहरात आजपासून म्हणजेच 7 ते 12 सप्टेंबरपर्यंत रात्री 10 पर्यंत लाऊडस्पीकर सुरु ठेवता येणार आहेत. याशिवाय 12 ते 17 सप्टेंबरपर्यंत म्हणजे पुढील पाच दिवस पुणे शहरात रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरु ठेवण्यास परवानगी असणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ही माहिती दिली आहे. यावर्षी गणेशोत्सव काळात तब्बल सात हजार पोलिसांचा शहरात काटेकोरपणे बंदोबस्त असणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात म्हणजेच 7, 16 आणि 17 तारखेला तीन दिवस पुणे शहरात पूर्णतः दारू बंदी असणार आहे. याशिवाय फरासखाना, विश्रामबाग आणि खडक भागात तब्बल 10 दिवस दारू बंदी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी शांततेत पार पडणार आहे.
Ganpati 2024 l पुणे शहरात लेझर लाईटला बंदी :
गणपती काळात काही दुर्घटना घडू नये म्हणून पुण्यातील तब्बल 756 आरोपीना प्रतिबंधात्मक नोटीसा देखील पुणे पोलिसांनी बजावल्या आहेत. याशिवाय कोयता मिळणाऱ्या ठिकाणाचा देखील शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
यावेळी आयुक्तांनी सांगितले की, पुणे शहरात यंदाच्या वर्षी तब्बल 3798 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. याशिवाय घरगुती गणपतीची संख्या ही 664257 इतकी आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1742 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. तसेच पुण्यात गणेशोत्सव काळात लेझर लाईटला बंदी असणार आहे. मात्र जर अशा घटना घडल्या तर थेट पोलीस कारवाई करणार आहेत. त्यासाठी 10 क्युआरटी टीम्स तैनात असणार आहेत.
News Title : Pune Ganpati Rules 2024
महत्वाच्या बातम्या-
बाप्पाचे आगमन होताच सोने-चांदीचे दर कडाडले; जाणून घ्या आजचे दर
खुशखबर! कोट्यवधी तरुणांना बँकेत मिळणार नोकरी, जाणून घ्या सविस्तर
बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या पूजेला लागणारे साहित्य व मंत्र
आज ‘या’ 4 राशींवर राहील बाप्पाची कृपा, सर्व मनोकामना होतील पूर्ण
विनेश फोगाट राजकीय मैदान गाजवणार, कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताच मिळालं विधानसभेचं तिकीट






