Govind Komkar Murder | पुण्यातील गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी रात्री उशिरा नाना पेठ परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद कोमकर (Govind Komkar Murder) याची काही हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरून गेले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाना पेठेत गोळीबार, गोविंद कोमकर ठार :
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेत गोविंद कोमकरवर (Govind Komkar Murder) अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सलग तीन गोळ्या झाडल्यानंतर गोविंदचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असूनही अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
Govind Komkar Murder | वनराज आंदेकर खून प्रकरणाशी संबंध :
गेल्या वर्षी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Aandekar) यांची नाना पेठ परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये गणेश कोमकरचे नाव समोर आले होते. आता त्याचा मुलगा गोविंद कोमकर याची हत्या झाल्याने ही गँगवॉरची कारवाई असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर आंदेकर खून प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वनराज आंदेकर हे 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांचे राजकीय कुटुंब मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. आई राजश्री आंदेकर या 2007 व 2012 मध्ये नगरसेविका राहिल्या होत्या. तसेच त्यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते. त्यामुळे आंदेकर कुटुंबाचा राजकीय वारसा लक्षवेधी ठरला आहे.






