पहिल्यांदा प्लॅन फसला, पण रात्री ‘तो’ जागेवर गेला…; पुण्यात नेमकं काय घडलं?

On: September 6, 2025 12:25 PM
Ayush Komkar Murder
---Advertisement---

Ayush Komkar Murder | गणेशोत्सवाच्या जल्लोषात पुणे डुंबले असतानाच शुक्रवारी रात्री नाना पेठेत गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या वर्षश्राद्धाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर टोळीने बदला घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या रक्तरंजित संघर्षात गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर (Ayush Komkar) (वय 18) याचा खून करण्यात आला.

चार दिवसांपूर्वीचा प्लॅन फसला :

मिळालेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीने 1 सप्टेंबर रोजीच बदला घेण्याचा डाव रचला होता. कृष्णा आंदेकरने काळे आणि मोहिते यांना आंबेगाव पठार भागात आरोपींच्या घराची रेकी करण्यासाठी पाठवलं होतं. रात्री काळेनं आरोपींच्या घराची हालचाल पाहून ती माहिती कृष्णाला व्हॉट्सॲप कॉलवर दिली. (Ayush Komkar News)

कृष्णाने अमनला पाठवण्याचं आश्वासन दिलं, पण अमन वेळेवर आला नाही. पुढे यश पाटील यालाही यात सामील करण्यात आलं आणि पाच हत्यारे घेऊन सात ते आठ जण सज्ज होते. मात्र पोलिसांना या कटाची खबर मिळाल्याने त्यांनी पाळत ठेवून पहिला डाव फसवला.

Ayush Komkar Murder | दुसऱ्याच प्रयत्नात आयुषवर हल्ला :

पहिला डाव हाणून पाडल्यानंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं. पण आंदेकर टोळीने हार मानली नाही. शुक्रवारी संध्याकाळी आयुष क्लासवरून घरी परतल्यावर नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

वनराज आंदेकर (Vanraj andekar) हत्या प्रकरणात आरोपी ठरलेला गणेश कोमकर हा प्रत्यक्षात आंदेकर कुटुंबाचाच जावई आहे. त्याची पत्नी बंडू आंदेकरची मुलगी आहे. त्यामुळे नातेसंबंध असूनही बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने सख्ख्या भाच्याचाही विचार केला नाही. आयुष हा महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्याच्यावर अशा पद्धतीने हल्ला झाल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

पोलिसांचा तपास सुरू :

दरम्यान, या हत्येनंतर पुणे पोलिसांनी परिसरात तातडीने पथके रवाना केली आहेत. आंदेकर टोळीचा हा कट पूर्वनियोजित होता की अचानक उचललेलं पाऊल, याबाबत तपास सुरू आहे.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे पहिला प्लॅन फसला होता, पण दुसऱ्याच प्रयत्नात आयुषचा बळी गेला आणि पुण्यातील गँगवॉर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

News Title : Pune Gangwar: Andekar gang’s first plan foiled, but Ayush Komkar shot dead in second attempt

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now